डोळवी गावाजवळ अपघातात एक ठार
By Admin | Updated: January 1, 2016 23:56 IST2016-01-01T23:56:05+5:302016-01-01T23:56:05+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील डोळवी गावाजवळ वॅगनर व एसटीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात वॅगनरमधील एक जण जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.

डोळवी गावाजवळ अपघातात एक ठार
वडखळ : मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील डोळवी गावाजवळ वॅगनर व एसटीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात वॅगनरमधील एक जण जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.
मुंबई-गोवा महामार्गावर १ जानेवारीला रात्री २ वाजण्याच्या सुमारास वडखळकडून नागोठणेकडे जाणारी वॅगनर (एमएच ०६ बीई ७८०१) व नागोठणे बाजूकडून वडखळकडे जाणारी एसटी (एमएच २० बीएल २४७६) यांच्यात डोळवी गावाजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात वॅगनरमधील उदय मोकल (२१, रा. कारावी) हा तरुण जागीच ठार झाला, तर मिथुन मोकल (२०, रा. कारावी) हा गंभीर जखमी झाला असून, जखमीला उपचारासाठी पनवेल येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत्यू झालेला उदय मोकल हा तरु ण क्र ीडा मंडळ कारावी संघाचा कबड्डी खेळाडू होता. त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मोटारसायकल अपघातात दोन जखमी
बिरवाडी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड तालुक्यातील नडगांवच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ११.३०च्या सुमारास इम्रान इब्राहिम शेख (२६, रा. मुंबई) व त्याचा साथीदार सुरज कनोजीया (२३) हे पल्सर मोटारसायकल (एमएच ०१/ बीई ७७५४) घसरून पडल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचाराकरिता महाड येथील रानडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींना पुढील उपचाराकरिता मुंबई हलविण्यात आले आहे.