राजेवाडी फाटा येथे अपघातात एक जखमी
By Admin | Updated: February 17, 2017 02:15 IST2017-02-17T02:15:16+5:302017-02-17T02:15:16+5:30
मुंबई-गोवा महामार्गावरील महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेवाडी फाटा येथे दुचाकीची जीपला धडक लागून

राजेवाडी फाटा येथे अपघातात एक जखमी
महाड : मुंबई-गोवा महामार्गावरील महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेवाडी फाटा येथे दुचाकीची जीपला धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार समीर रफिक मांडलेकर (२८, रा. म्हाप्रळ) हे गंभीर जखमी झाले आहेत.
दुचाकीस्वार समीर मांडलेकर हा आपल्या ताब्यातील दुचाकी पोलादपूर ते महाड अशी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून चालवित घेऊन जात असताना पुण्याकडून म्हाप्रळकडे जाणाऱ्या जीप क्रमांक एमएच ४२ ए १८६१ने दुचाकीला जोरदार धडक दिली. झालेल्या अपघातात दुचाकीस्वार समीर मांडलेकर यांना गंभीर दुखापत होऊन जखमी झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. बोलेरो जीपचालक बाळासाहेब कामथे (५०,रा. शिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी दुचाकीस्वार समीर मांडलेकर यांना उपचाराकरिता महाड शहरातील रानडे
रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेनंतर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रवी सरणेकर, सागर घासे यांनी जखमीला तत्काळ मदत दिल्याने त्यांचे प्राण वाचले.