शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

रायगड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी मुंबईतील श्री सिद्धिविनायक न्यासाकडून एक कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 2:57 PM

  मुंबईतील श्री सिद्धिविनायक न्यासा कडून रायगड जलयुक्त शिवार अभियानाकरीता न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते आज एक काेटी रुपयांचा धनादेश रायगडचे जिल्हाधिकारी डाॅ.विजय सुर्यवंशी यांना सुपूर्द करण्यात आला.

 - जयंत धुळप

रायगड  -  मुंबईतील श्री सिद्धिविनायक न्यासा कडून रायगड जलयुक्त शिवार अभियानाकरीता न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते आज एक काेटी रुपयांचा धनादेश रायगडचे जिल्हाधिकारी डाॅ.विजय सूर्यवंशी यांना सुपूर्द करण्यात आला. रायगड जिल्हा प्रशासनाने सहकार्य करून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गा लगत जागा उपलब्ध करुन दिल्यास अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा संकल्प न्यासाचा असेल्याचे बांदेकर यांनी यावेळी लाेकमतशी बाेलताना सांगितले.

ग्राम सामाजिक परिवर्तन याेजनेकरिता कालच १० काेटी रुपये मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यासाने सुपूर्द  केले असून, या अंतर्गत रायगड जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायती व ५६ गावांमंध्ये ही याेजना राबविण्यात येणार असल्याचे बांदेकर यांनी पूढे सांगीतले.

दरम्यान गाेवा महामार्गावर नागाेठणे येथे ट्राॅमा केअर सेंटर उभारण्याकरीता सहकार्य करावे या जिल्हाधिका-यांच्या प्रस्तावास बांदेकर यांनी तत्वतः मान्यता दिली. तर रायगडमध्ये गाव तिथे वाचनालय या जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतेही त्यांनी स्वागत केले.सिद्धिविनायक न्यासाच्या माध्यमातून राज्यभरात देण्यात येणाऱ्या १०२ डायलेसीस मशिन्स पैकी ४ मशिन्स अलिबाग जिल्हा रुग्णालयास, चार मशिन्स माणगांव शासकीय रुग्णालयास तर चार मशिन्स महाड शासकीय रुग्णालयास देण्यात येणार असून त्याची प्रक्रीया अंतिम टप्प्यात असल्याचे बांदेकर यांनी सांगितले.

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने गेल्या आठ महिन्यांत न्यासाने केलेली लाेकाेपयाेगी कामे

 - डायलीसिस फक्त रु.२५०/--  मागील ८ महिन्यात ७७५० सिटींग्स-  ८ महिन्यांत ३५००रुग्णांना ७ कोटी ५० लाख अर्थसहाय्य मंजूर !- राज्यातील ३४ जिल्हा/उपजिल्हा रुग्णालयांना ७ कोटी ५० लाख रकमेचे १०२ डायलीसिस युनिट्स व आरो प्लांट !- राज्यातील विविध शासकीय/ निमशासकीय रुग्णालयांना २ कोटी ६ लाख रकमेची वैद्यकीय उपकरणे पुरविणार !- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्राॅमा केअर सेंटर. १ कोटी २३ लाख निधीची तरतूद !- पुस्तकपेढी योजनेअंतर्गत २० हजार विद्यार्थ्यांना १ लाख७० हजार क्रमिक पुस्तकांचे वाटप !- ग्रंथालय/ अभ्यासिकेत ७५० विद्यार्थ्यांना प्रवेश !- १ लाख पुस्तकांचा समावेश असलेले सुसज्ज ग्रंथालय लवकरच नागरिकांच्या सेवेत !- कु. प्रियांका विजय गवळी (बुलढाणा) या आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाकरिता ७ लाख २८ हजार रुपयांची मदत - राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेकरिता ३४ जिल्ह्यांना रू. ७४.५० लाख पैकी ७ कोटी अर्थसहाय्य गेल्या ८ महिन्यांत वितरण- नाम फाऊंडेशन संस्थेकरिता ३ पोकलेन मशीन व १० जलशुद्धीकरण संच - राज्य शासनाच्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानास १० कोटींचे अर्थसहाय्य - माजी सैनिकांच्या विधवा, माजी सैनिकांकरिता ध्वजनिधीस रू. ५ लाख अर्थसहाय्य - आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांच्या केजी ते पीजी शिक्षणाचा खर्च करण्याचा निर्णय

टॅग्स :Sidhivinayak Devsthanसिद्धीविनायक देवस्थानMumbaiमुंबईRaigadरायगडAdesh Bandekarआदेश बांदेकर