एक कोटी ८१ लाखांची शेतकऱ्यांना नुकसानभरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 00:23 IST2020-01-06T00:23:34+5:302020-01-06T00:23:36+5:30
अवकाळी पावसामुळे कर्जत तालुक्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना एक कोटी ८१ लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे,

एक कोटी ८१ लाखांची शेतकऱ्यांना नुकसानभरपाई
कर्जत : अवकाळी पावसामुळे कर्जत तालुक्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना एक कोटी ८१ लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे, हे पैसे शेतकºयांच्या बँक खात्यात जमा झाले असल्याची माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.
कर्जत तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकºयांच्या भातशेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. तहसीलदार कार्यालयातील तलाठी, पंचायत समिती कार्यालयातील ग्रामसेवक आणि तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहायक तीनही कार्यालयाने एकत्रित पंचनामे केले होते. तालुक्यात १८६ गावे आहेत. १८,०५२ हेक्टर शेतजमीन आहे, अवकाळी पावसामुळे शेतात कापलेला भात भिजून खराब झाले, शेतात पाणी साठल्याने पिकाचे नुकसान झाले तर काहींवर बुरशी आली, अशा पाच हजार ७१८ शेतकºयांचे २११६.४२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. शासनाने जाहीर केलेल्या आठ हजार रुपये एकरीप्रमाणे तालुक्यातील पाच हजार ७१८ शेतकºयांना एक कोटी ८१ लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली.