शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

अलिबाग-रेवदंडा मार्गावरील जुन्या पुलांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 6:11 AM

या पुलांची वेळेत डागडुजी केली नाही तर पावसाळ्यात या पट्ट्यातील बहुतांश गावांचा संपर्क अलिबागपासून तुटण्याची शक्यता आहे.

बोर्ली-मांडला : अलिबाग तालुक्यातील नवेदर बेली, आक्षी (जुना) आणि साळाव पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. या पुलांची वेळेत डागडुजी केली नाही तर पावसाळ्यात या पट्ट्यातील बहुतांश गावांचा संपर्क अलिबागपासून तुटण्याची शक्यता आहे.रायगड जिल्ह्यातील साळाव रेवदंडा खाडीपुलामुळे अलिबाग, मुरु ड आणि रोहा हे तीन तालुके जवळ आले आहेत. साळाव -रेवदंडा खाडी पुलाचे काम हे १९८६ मध्ये करण्यात आले असून पुलाची लांबी ५१० मीटर आहे. पुलाच्या निर्मितीपूर्वी मुंबई, पुणे येथे जाण्यासाठी चणेरा, रोहा, नागोठणे मार्गे वडखळ पेण किंवा साळाव जेट्टी वरून छोट्या होड्यांनी रेवदंडापर्यंत जलप्रवास करावा लागे. मात्र पूल झाल्यानंतर वाहतूक जलद मार्गाने सुरू झाली. त्यामुळे मुरुड तालुक्याचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास झाला.साळाव येथे १९८७-८८ मध्ये बिर्ला उद्योग समूहाचा लोखंड शुद्धीकरणाचा प्रकल्प आला, त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध झाला, यावेळी दळणवळणासाठी पूल महत्त्वाचा ठरला.देखभाल दुरुस्तीअभावी सध्या पुलाच्या चौथ्या आणि पाचव्या जॉइंटमध्ये भेगा पडल्या आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित काम हाती घेणे गरजेचे आहे. काही वर्षापूर्वी पुलाला पडलेली भेग, खड्डे बांधकाम विभागाने काँक्रीटीकरण करून बुजवले होते.मुरुडमध्ये येणारे पर्यटक याच पुलावरून येत असल्याने वर्षभर या पुलावर वाहनांची वर्दळ असते. त्याप्रमाणे अवजड वाहनेही याच पुलावरून ये-जा करतात. पुलावरून किती क्षमतेची वाहने जावी, या संदर्भात बांधकाम विभाग अलिबाग यांनी संबंधित पोलीस ठाण्याशी पत्रव्यवहार केल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याची अंमलबजावणी मात्र झालेली दिसत नाही.अलिबाग-रेवदंडा या रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी बांधकाम विभागाने नागावला जोडणारा सहाण -पाल्हे या बाह्य मार्गावर साखर खाडी पूल उभारला आहे. पुलाची लांबी ५२ मीटर असून या पुलालाही जवळपास ३० वर्षे झाली आहेत. अवजड वाहतुकीमुळे पुलाची दुर्दशा झाली आहे. पुलाच्या खालच्या बाजूस काँक्रीटीकरण करण्यात आले असले तरी ते कोसळल्याने लोखंडी सळ्या दिसू लागल्या आहेत. पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नागाव येथून रोह्याकडे जाणाऱ्या नागरिकांचा पुलामुळे बराच वेळ वाचतो आहे, मात्र साखर खाडी पूल बंद झाला तर जवळपास १० गावांचा संपर्क तुटणार आहे.नवेदर बेली पूललोखंडी पाइप तुटले१नवेदर बेली पूलही जीर्णावस्थेत असून सुरक्षेसाठी असलेले दोन्ही बाजूचे लोखंडी पाइप तुटलेले आहेत. शिवाय पुलासाठी असलेल्या निमुळत्या असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.२परिसरात आक्षी येथे काही वर्षापूर्वी नवा पूल बांधण्यात आला असला तरी जुन्या पुलाची डागडुजी केल्यास हलक्या वाहनांसाठी तो सोयीचा ठरेल, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.३पुलाचे दोन्ही बाजूला उतार असल्याने वाहनांची समोरासमोर ठोकर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय आक्षी रेवदंडा मार्गही अरुंद असल्याने एकाचवेळी दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास वाहतूक कोंडी होते. अलिबाग, रेवदंडा, साळाव परिसरातील पुलांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.अलिबाग तालुक्यातील बेली, आक्षी, नागाव सहाण पाल्हे या मार्गावरील साखर खाडीवरील पूल आणि साळाव रेवदंडा पूल आदींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले आहे. त्याचे अंदाजपत्रक बनविण्याचे काम सुरू आहे. लवकरच ते अंदाजपत्रक वरिष्ठ कार्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात येईल.- मधुकर चव्हाण, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, अलिबागसध्या पुलाच्या संरक्षण कठड्यांची दुरवस्था झाली आहे. काही कठड्यांचा भाग कोसळला आहे. मध्यंतरी तीन ते चारवेळा रोहा तालुक्यातील सानेगाव येथील इंडो एनर्जी या जेट्टीवर जाणाºया दगडी कोळशाच्या बार्जच्या धडकेमुळे पूल अधिकच कमकुवत झाला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक