पनवेलच्या १३ मंडळांना नगर परिषदेच्या नोटीसा
By Admin | Updated: September 19, 2015 23:56 IST2015-09-19T23:56:54+5:302015-09-19T23:56:54+5:30
उच्च न्यायालयाने रस्त्यावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास मनाई केली असतानाही अनेक मंडळानी अनधिकृत कमानी उभारून तसेच बॅनरबाजी करून शहर

पनवेलच्या १३ मंडळांना नगर परिषदेच्या नोटीसा
- वैभव गायकर, पनवेल
उच्च न्यायालयाने रस्त्यावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास मनाई केली असतानाही अनेक मंडळानी अनधिकृत कमानी उभारून तसेच बॅनरबाजी करून शहर विद्रूपीकरण करण्यास सुरुवात केली आहे. पनवेल नगर परिषदेने शहरातील १३ मंडळांना शहर विद्रूपीकरण कायद्यांतर्गत नोटिसा पाठवून उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी एका दिवसात हटविण्याचे आदेश दिले आहेत.
पनवेल शहरातील रस्ते अरुंद असल्याने उत्सवकाळात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. उत्सवकाळात मोठमोठ्या कमानी उभारून सार्वजनिक मंडळांकडून राजकीय संघटना अथवा बांधकाम व्यावसायिकांच्या जाहिराती केल्या जातात. मात्र या कमानी उभारताना स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या परवानग्या घेतल्या जात नाहीत. याउलट कमानी उभारताना रस्त्यांच्या मध्ये खड्डे खोदले जातात. उत्सव संपल्यानंतर अशा रस्त्यांची डागडजी स्थानिक प्रशासनाला करावी लागते. अनधिकृतपणे कमानी उभारणाऱ्या मंडळाना पनवेल नगर परिषदेने शनिवार नोटिसा पाठवून एका दिवसात या कमानी हटविण्याचे आदेश दिले आहेत. या १३ मंडळामध्ये अभीनव मित्रमंडळ पायोनियर , पनवेल शहर शिवसेना शाखा लाईन अली , गणेश मित्र मंडळ टपाल नाका , जय महाकाळी मित्रमंडळ ठाणा नाका रोड ,साई बाबा मित्रमंडळ उरण नाका , साई स्रध्दा मित्रमंडळ बंदर रोड , रोज बजार मित्रमंडळ आंबेडकर रोड , गंठण व कोनल पटेल ज्वेलर्स एमजे रोड, मल्हार मित्रमंडळ मिडलक्लास सोसायटी , ओमकार मित्रमंडळ प्रभु अली , सांस्कृतिक मित्रमंडळ मिडलकलास सोसायटी , युवा जागृती आणि सांस्कृतिक सामाजिक मंडळ रोहिदास वाडा , स्वराज्य मित्र मंडळ मिरची गल्ली मंडळाचा समावेश आहे .
पनवेल नगर परिषद हद्दीत नगर परिषदेने नोटीसा धाडून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र सिडको नोडमध्ये उभारलेल्या अनधिकृत बॅनरबाजीवर कारवाई कोण करणार, असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. खारघर, कामोठे, कळंबोळीमध्येही अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात विनापरवाना कमानी उभारण्यात आली आहे. सिडकोचे अनधिकृत नियत्रंक विभाग यावर कारवाई करीत असते. मात्र गणेशोत्सव सुरू होऊनही अशाप्रकारचे शहरांचे मोठ्या प्रमाणात विद्रूपीकरण सुरूच आहे.
पनवेल नगर परिषद हद्दीतील १३ मंडळांना आम्ही शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत नोटिसा रोजी बजावल्या आहेत . उभारलेल्या अनधिकृत कमानी हटविण्यासाठी मंडळांना एक दिवसाचा काळावधी दिला आहे. या कमानी मंडळानी स्वत: हटविल्या नाहीत तर नगर परिषद विशेष मोहीम राबवून या कमानी हटवेल व अशा मंडळांवर गुन्हे दाखल करेल .
- चारुशीला पंडित,
अतिरिक्त मुख्याधिकारी,
पनवेल नगर परिषद.