न. प. निवडणूक कार्यक्रम जाहीर

By Admin | Updated: October 24, 2016 02:49 IST2016-10-24T02:49:11+5:302016-10-24T02:49:11+5:30

रोहा नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी संपन्न होणार आहे. याबाबत उमेदवार, राजकीय पक्ष, अधिकारी वर्ग यांनी आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाब

No Par. Election Program Announced | न. प. निवडणूक कार्यक्रम जाहीर

न. प. निवडणूक कार्यक्रम जाहीर

रोहा : रोहा नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी संपन्न होणार आहे. याबाबत उमेदवार, राजकीय पक्ष, अधिकारी वर्ग यांनी आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत घ्यावयाच्या खबरदारीची माहिती अवगत करण्यासाठी उपविभागीय अधिकारी रवींद्र बोंबले यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक सभागृह रोहा येथे बैठकीचे आयोजन केले होते.
या सभेला तहसीलदार सुरेश काशिद, रोहा मुख्याधिकारी प्रकाश पाटील, पीआय निशा जाधव, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी नितीन सरकी उपस्थित होते. रोहा नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर झाला असून २४ ते २९ आॅक्टोबर या कालावधीत स. ११ ते ३ या वेळेत नगर परिषद सभागृहात नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. या निवडणुकीचा निकाल २८ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीने नगरसेवक पदाच्या निवडणुका होणार असून नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून दिला जाणार आहे. रोहा नगरपरिषदेच्या प्रभाग क्र . १ ते ७ मधून प्रत्येकी २ उमेदवार निवडून जाणार असून प्रभाग क्र . ८ मधून ३ उमेदवार निवडून जाणार आहेत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी फिक्या गुलाबी रंगाची मतपत्रिका राहणार आहे. प्रभाग क्र . १ ते ८ मधील अ उमेदवारासाठी पांढऱ्या रंगाची तर ब उमेदवारासाठी फिक्या निळ्या रंगाच्या मतपत्रिका वापरण्यात येणार आहेत. प्रभाग क्र मांक ८ मधील क उमेदवारांसाठी फिक्या पिवळ्या रंगाची मतपत्रिका वापरण्यात येणार असल्याचे बोंबले यांनी सांगितले. रोहा नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात एकूण २२ मतदान केंद्रे राहणार आहेत. निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी तसेच आचारसंहितेची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे अथवा नाही याची पाहणी करण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. (वार्ताहर)

Web Title: No Par. Election Program Announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.