सात महिने उलटूनही कारवाई नाही
By Admin | Updated: May 14, 2017 22:51 IST2017-05-14T22:51:18+5:302017-05-14T22:51:18+5:30
राज्य परिवहन मंडळाच्या बोरीवली-पुणे एसटी बसवरील चालक दीपक जायभाये यास निशीसागर हॉटेल कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती.

सात महिने उलटूनही कारवाई नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
वावोशी : राज्य परिवहन मंडळाच्या बोरीवली-पुणे एसटी बसवरील चालक दीपक जायभाये यास निशीसागर हॉटेल कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेस सात महिने उलटूनही निशीसागर कर्मचाऱ्यांवर व हॉटेलवर कुठलीच कायदेशीर कारवाई न झाल्याने एसटी कामगार संघटनांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. एसटीच्या विभाग नियंत्रक कार्यालयाने हॉटेल व्यवस्थापनाला दिलेल्या कारणे दाखवा नोटिसीलाही हॉटेल व्यवस्थापनाने केराची टोपली दाखविली आहे. एसटी चालकास मारहाण करणाऱ्या निशीसागर हॉटेलचा थांबा रद्द करावा या एसटी संघटनेच्या मागणीबाबतही एसटी प्रशासन मौन बाळगून आहे.
एसटी महामंडळाच्या बोरीवली-पुणे एसटी बस १ आॅक्टोबर २०१६ रोजी द्रुतगती महामार्गावरील निशीसागर हॉटेलमध्ये हा प्रकार घडला होता. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात तक्र ार दिली. तसेच एसटी कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष देवानंद गरु ड यांनी विभाग नियंत्रक (पुणे) कार्यालयात संघटनेचे पत्र पाठवून चौकशीची मागणी करीत अशा हॉटेलचा थांबा रद्द करावा, अशी मागणी केली.या घटनेला सात महिने उलटूनही काही कारवाई झाली नाही.