नव्या सावित्री पुलाचे काम पाच दिवसांत होणार पूर्ण
By Admin | Updated: May 11, 2017 02:08 IST2017-05-11T02:08:48+5:302017-05-11T02:08:48+5:30
दुर्घटनाग्रस्त सावित्री पुलानजीक बांधण्यात येत असलेल्या नव्या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या पाच दिवसांत

नव्या सावित्री पुलाचे काम पाच दिवसांत होणार पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : दुर्घटनाग्रस्त सावित्री पुलानजीक बांधण्यात येत असलेल्या नव्या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या पाच दिवसांत १५ मेपर्यंत पुलाचे आवश्यक ते सर्व काम पूर्ण होईल, अशी माहिती या पुलाचे काम करीत असलेल्या टी अँड टी या ठेकेदार कंपनीचे साईट इंजिनीअर गायकवाड यांनी दिली. ५ जून रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी १८० दिवसांची (सहा महिने) मुदत देण्यात आली असताना पाच महिन्यांमध्येच हे काम पूर्ण होणार आहे.
बारा गाळ्यांच्या तीन पदरी पुलाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ दोन स्लॅब टाकण्याचे काम शिल्लक असून १५ मेपूर्वी हे काम पूर्ण होईल.
रस्त्याच्या भरावाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसात खडीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. हा पूल बारा गाळ्यांचा, तीन पदरी आणि पदपथासह सोळा मीटर रु ंदीचा आहे. साधारणत: या मोजमापाचा पूल पूर्ण होण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागतो. मात्र या पुलाचे महत्त्व विचारात घेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी
१८० दिवसांत पूल उभा करण्यात येईल असे जाहीर केले होते. निविदेमध्येही तशी अट टाकण्यात आली होती.
टी अँड टी या ठेकेदार कंपनीने हे आव्हान स्वीकारत तीन पाळ्यांमध्ये रात्रंदिवस काम करून पाच महिन्यांमध्येच हे काम पूर्ण करीत आणले आहे. पुलाचे रेलिंग, कलरिंग आदि कामे ५ जूनपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत.