शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जुन्याच कामांची नव्याने डागडुजी; माथेरानमध्ये बिले काढण्यासाठी खटाटोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:15 PM

ठेकेदाराचा प्रताप, मुदतवाढ देऊनही कामे अपूर्णच

माथेरान : विविध शासकीय निधीतून विकासकामे सुरू असताना जी अत्यावश्यक महत्त्वाची कामे पूर्ण करावयाची आहेत ती बाजूला सारून जुन्या कामांची नव्याने डागडुजी केली जात असल्याने केवळ आपली बिले काढण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेरिटेज वास्तू असलेल्या माथेरानमधील मध्यवर्ती भागात असलेल्या कापडिया मार्केटच्या नूतनीकरणासाठी जवळपास पाऊण कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये मटण मार्केट सुशोभीकरण त्याचप्रमाणे अंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी खर्च केला जाणार आहे; परंतु मटण मार्केट, गिरणी दुकाने यांची पूर्णत: दुरुस्तीची कामे अन्य दुकानांच्या रेस्टॉरंटच्या सांडपाण्याचा निचरा करणेसाठी पाइपलाइन बसविणे ही कामे या मोठ्या रकमेच्या खर्चातून पूर्ण करायची आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना अनेकदा मुदतवाढसुद्धा देण्यात आली आहे. परंतु ही कामे आजही कासवगतीने सुरू आहेत. याच मार्केटमधील कठड्यावर रविवारच्या बाजाराला भाजीविक्रेते व अन्य व्यावसायिक आपला व्यवसाय करीत असतात. हा कठडा मागील तीन ते चार वर्षांपूर्वी नगर परिषदेमार्फत बनविण्यात आला होता. त्या मजबूत कठड्याचा वरील भाग तोडून पुन्हा नव्याने काम सुरू केले आहे. हा कठडा तोडण्याची काहीही आवश्यकता नसताना हे काम कुणा एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून मर्जीनुसार केले जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच अशा दुबार कामांबाबत आश्चर्य व्यक्त होते आहे.नगर परिषदेचे दुर्लक्षया तोडण्यात आलेल्या कठड्यातील दगडमाती त्याच कामासाठी वापरली जात आहे. हा सुरू असलेला सर्व खेळ वाढीव कामे दाखवून ठेकेदारांची बिले काढण्यासाठी असून, याकडे नगर परिषदेचे अभियंते तसेच कार्यतत्पर लोकप्रतिनिधी आणि नगर परिषद प्रशासन हेतुपुरस्सर कानाडोळा करीत असल्याने या गावात सध्यातरी काय चाललंय, विकासकामे होत आहेत की केवळ ठेकेदारांच्या आणि मर्जीतल्या लोकांना कामे देऊन त्यांच्या फायद्यासाठी संबंधित ठेकेदारांना सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे, असे नागरिक बोलत आहेत.