एनसीसीचे माजी विद्यार्थी बनले गुरू

By Admin | Updated: September 5, 2015 03:05 IST2015-09-05T03:05:13+5:302015-09-05T03:05:13+5:30

जेएसएम कॉलेज एनसीसीच्या माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांचे गुरू बनण्याचा विडाच उचलला आहे. त्याकरिता त्यांनी ‘एक्स एनसीसी युनिट अलिबाग’ची स्थापना केली आहे

NCT students become guru's former student | एनसीसीचे माजी विद्यार्थी बनले गुरू

एनसीसीचे माजी विद्यार्थी बनले गुरू

अलिबाग : जेएसएम कॉलेज एनसीसीच्या माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांचे गुरू बनण्याचा विडाच उचलला आहे. त्याकरिता त्यांनी ‘एक्स एनसीसी युनिट अलिबाग’ची स्थापना केली आहे. यामध्ये सुमारे ६० माजी विद्यार्थी स्वेच्छेने सहभागी झाले आहेत. गुरुवारी जेएसएम कॉलेज, माजी विद्यार्थ्यांचे एक्स एनसीसी युनिट अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जेएसएम कॉलेजच्या आजी विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीविषयी आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने तसेच सामाजिक बांधिलकीची भावना विकसित करून सोशल नेटवर्किंगमध्ये अडकलेली तरुण पिढी राष्ट्रहिताकडे वळावी या उद्देशाने एका कार्यक्रमाचे आयोजन जेएसएम कॉलेजच्या केळूसकर सभागृहात करण्यात आले होते.
मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक म्हणून अत्यंत प्रभावी काम केलेले आणि २६ जानेवारीला दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोरील रिपब्लिक डे परेडमध्ये एनएसएसचे नेतृत्व केलेले याच जेएसएम कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि विद्यमान प्राचार्य डॉ. अनिल पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जेएसएम कॉलेज एनसीसी प्रमुख प्रा.डॉ. मोहसिन खान आवर्जून उपस्थित होते.
मुंबई पोलीसमधील विशेष सुरक्षा शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आमले यांनी मार्गदर्शक करताना म्हणाले की, आपण एनसीसीच्या माध्यमातून कसे घडलो हे सांगितले. आपल्या जीवनाचा आतापर्यंतचा जीवनपट उलगडून सांगितला.
या वेळी प्राचार्य डॉ. अनिल पाटील, गिर्यारोहक नंदकिशोर वडेर, आरडीसीसी बँकेचे मंदार वर्तक, गेल इंडियाचे राष्ट्रीय क्रिकेटपटू प्रीतिलेश चौलकर यांनी आपले विचार व्यक्त केले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: NCT students become guru's former student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.