म्हसळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व
By Admin | Updated: January 12, 2016 00:54 IST2016-01-12T00:54:00+5:302016-01-12T00:54:00+5:30
नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवले. काँग्रेस (आय) ला तीन जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेना

म्हसळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व
म्हसळा : नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवले. काँग्रेस (आय) ला तीन जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेना एका जागेवर विजयी झाली, तर तीन अपक्षांनी बाजी मारली.
प्रभाग क्र . ०१ काँग्रेस (आय)चे सुहेब हळदे, प्र. २ मधून राष्ट्रवादीच्या फलक हुर्जुक. प्र. ३ मधून काँग्रेस (आय) च्या फातिमा पेणकर , प्र. ४ मधून राष्ट्रवादीचे किरण गायकवाड, प्र. ५ मधून राष्ट्रवादीचे नासीर जुबेर दळवी, प्र. ६ मधून राष्ट्रवादीच्या जयश्री कापरे, प्र. ७ मधून शिवसेनेच्या संपदा पोतदार, प्र. ८ मधून राष्ट्रवादीचे संजय कर्णिक, प्र. ९ मधून राष्ट्रवादीच्या कविता बोरकर, प्र. १० मधून अपक्ष सुभान हळदे, प्र. ११ मधून अपक्ष शहनाज हुर्जुक, प्र. १२ काँग्रेस (आय)च्या अस्मिता पोतदार, प्र. १३ अपक्ष संतोष काते, प्र. १४ राष्ट्रवादीच्या शीतल मांडवकर, प्र .१५ मधून राष्ट्रवादीच्या सेजल खताते, प्र. १६ राष्ट्रवादीचे दिलीप कांबळे, प्र. १७ मधून राष्ट्रवादीचे मारु ती पवार हे बिनविरोध निवडून आले.