राष्ट्रवादी-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
By Admin | Updated: January 9, 2016 23:43 IST2016-01-09T23:43:51+5:302016-01-09T23:43:51+5:30
तळा नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमार तळा बाजारपेठेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या सशस्त्र मारामारी प्रकरणी

राष्ट्रवादी-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
अलिबाग : तळा नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमार तळा बाजारपेठेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या सशस्त्र मारामारी प्रकरणी तळा पोलीसांनी उभय राजकीय पक्षांच्या एकूण ४१ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. उभय गटाच्या एकूण १४ जणांना अटक केल्याची माहिती रायगड जिल्हा पेलिस अधिक्षक कार्यालयाच्या सुत्रांनी दिली आहे.
उभय राजकीय पक्षांच्यावतीने तळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. यातील पहिली तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांने केली आहे. रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास तळा बाजारपेठ येथे निवडणूकीसाठी काही शहरा बाहेरील व्यक्ती पैसे वाटण्यासाठी आल्याचे समजल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विचारपूस केली. यावेळी त्यांच्यात वाद झाला. सुमारे १७ जणांनी हातात काठ्या, तलवारी,लोखंडी सळया घेवून तक्रारदारांशी वाद घालल्याने त्यांच्यात झटापट झाली. यावेळी झटापटीत फिर्यादी यांच्या गळ््यातील सात तोळे वजनाची सोन्याची चेन व पेंडन आरोपींनी हिसकावून घेतल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. याप्रकरणी तळा पोलीसांनी गुन्हा दाखल करुन, त्यापैकी ८ जणांना अटक केली आहे.