मुरु ड उपनगराध्यक्षपदी नौसिन दरोगे बिनविरोध

By Admin | Updated: December 30, 2016 03:57 IST2016-12-30T03:57:17+5:302016-12-30T03:57:17+5:30

मुरुड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नौसिन दरोगे यांची बिनविरोध निवड झाली, तर स्वीकृत नगरसेवकपदी रहिम कबले व मनोज भगत यांची नियुक्ती करण्यात आली.

Navin will be elected unopposed | मुरु ड उपनगराध्यक्षपदी नौसिन दरोगे बिनविरोध

मुरु ड उपनगराध्यक्षपदी नौसिन दरोगे बिनविरोध

आगरदांडा : मुरुड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नौसिन दरोगे यांची बिनविरोध निवड झाली, तर स्वीकृत नगरसेवकपदी रहिम कबले व मनोज भगत यांची नियुक्ती करण्यात आली.
मुरुड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे ९ नगरसेवक निवडून आले असून नगराध्यक्षपदी स्नेहा पाटील यांची निवड झाली होती. अपक्ष पांडुरंग आरेकर होते. शासनाच्या नव्या नियमानुसार उपनगराध्यक्ष व स्वीकृ त नगरसेवक पदाची निवडणूक प्रक्रि या नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नगराध्यक्षा तथा पीठासन अधिकारी स्नेहा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्षपदाची निवडणूक नगरपरिषदेच्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात पार पडली. उपनगराध्यक्षपदासाठी नौसिन दरोगे यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासन अधिकारी स्नेहा पाटील यांनी नौसिन दरोगे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून दोन तर आघाडीकडून एक उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी शिवसेनेकडून महेश भगत यांनी अर्ज मागे घेतल्याचे गटनेते मुग्धा जोशी यांनी सभागृहात सांगितले. पीठासन अधिकारी पाटील यांनी रहिम कबले व मनोज भगत यांची स्वीकृतनगरसेवक म्हणून नियुक्ती झाल्याचे जाहीर केले. (वार्ताहर)

Web Title: Navin will be elected unopposed