शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना लवकर मदत मिळाली - सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 00:26 IST

राज्यातील अद्यापर्यंत आलेल्या आपत्तीपैकी सर्वात आगोदर मदत ही कोकणातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मिळाली असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले.

माणगाव : निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीमुळे संपूर्ण कोकणासह रायगड जिल्ह्याचे कंबरडे मोडले आहे. काही तांत्रिक कारणे वगळता राज्यातील अद्यापर्यंत आलेल्या आपत्तीपैकी सर्वात आगोदर मदत ही कोकणातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मिळाली असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले.माणगाव तालुक्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय भवनात १७ आॅगस्ट रोजी रायगड लोकसभा ३२ चे खासदार तटकरे यांनी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना दिलेल्या मदतीच्या रक्कमेचा आढावा घेतला. माणगांवचे पत्रकारांनी निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांच्या प्रश्ना संदभार्तील त्रूटी दुरुस्ती व न्याय मिळवून देण्यासाठी ७ सप्टेंबरला उपोषणास बसणार असल्याचे पत्र राज्याचे महसूलमंत्री, रायगडच्या पालकमंत्री व खासदार सुनिल तटकरे यांच्या नावे दिले असल्याने या पत्राचा खुलासा खासदारांनी पत्रकार परिषद बोलावून केला.तालुक्यातील नुकसानग्रस्तांना सुमारे ९७ टक्के भरपाई मदत खात्यात जमा झाली असल्याचे माणगांव तहसिलदार यांनी स्पष्ट केले. व काही मानवी चुकांमुळे पंचानाम्यात असलेल्या त्रुटी आपल्यापर्यंत कोणीही नुकसानग्रस्त घेऊन आल्यास पत्रकार बांधवानी संबधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणुन देऊन मदत मिळवुन देऊन नुकसानग्रस्तांस सहकार्य करावे, असे आवहान खासदार तटकरे यांनी पत्रकार परीषदेत केले आहे. यावेळी माणगांव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर-जाधव, तहसिलदार प्रियांका आयरे- कांबळे, नायब तहसिलदार भाबड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, माणगांवचे माजी नगराध्यक्ष आनंद यादव व तालुक्यातील विविध बँकाचे अधिकारी व विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.घरगुती वापराची भांडी वापराचे कपडे या ााठी हि काल परवा जिल्हाधिकारी याच्याकडे शासनाने फंड जमा झाल्याचे सांगून, पंचनाम्यात घरगुती भांडी व कपड्यानसाठी नुकसानग्रस्तांना आलेल्या वाढीव मदत रक्कम देखील खात्यात लवकरात लवकर जमा करावी असे आदेश देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.>पंचनाम्यात चुका असतील तर प्रांत, तहसील कार्यालयात कळवामाणगाव तालुक्यातील बेलदर समाजाची घरे ही वनविभागाच्या जागेत असल्याने त्यांना शासन भरपाई देऊ शकत नाही. आदिवासी समाजाला मात्र वनविभागाची जागा कायद्यानुसार देतात, त्यामुळे वनविभागात राहणाºया आदिवासी बांधवांना नुकसान भरपाई मदत दिल्याचे खा.तटकरे यांनी सांगितले. पंचनाम्यात जर काही चुका झाल्या असतील, तर संबंधित व्यक्तीचा अर्ज आणून प्रांत व तहसील कार्यालयात अधिकाºयांना दाखवावे. पंचनामा व आपल्याला मिळालेली शासन मदत यात काही तफावत असेल, तर दोन दिवसांत त्याचा निर्वाळा करून मिळेल, असेही तटकरे यांनी यावेळी बोलून प्रांत व तहसीलदारांना सूचना दिल्या.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरे