शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

राष्ट्रीय लोकअदालतीचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 5:01 AM

दाखलपूर्व प्रकरणात १०३ कोटी : तर प्रलंबित प्रकरणात १६ कोटी रु पयांची वसुली

जयंत धुळप ।अलिबाग : रायगड जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे रविवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालत उपक्रमात रायगड जिल्ह्यात न्यायालयातील प्रलंबित दोन हजार ३५३ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन १६ कोटी २४ लाख ९७ हजार ८५३ रु पये, तर दाखलपूर्व ५० हजार ३२६ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन १०३ कोटी ६० लाख ९९ हजार ८९७ रु पये रकमेची वसुली करण्यात आली.या लोकअदालतीचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश के. आर. पेठकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या वेळी उपजिल्हाधिकारी भूसंपादन विश्वनाथ वेटकोळी, जिल्हा सरकारी वकील संतोष पवार, वकील संघटनेचे सचिव ए. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा विधि एवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप मोहिते यांनी केले. सूत्रसंचालन दुसरे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर हेमा पाटील यांनी, तर आभार प्रदर्शन वृषाली पाटील तिसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर यांनी केले.लोकअदालतीत प्रलंबित भूसंपादनाच्या १०४ प्रकरणांत तडजोड होऊन ११ कोटी रु पये, मोटार अपघात दाव्यांच्या ४६ प्रकरणांत तडजोड होऊन ३३ कोटी ५४ लाख चार हजार ७९५ रु पये नुकसानभरपाई देण्यात आली. तर अन्य २२०३ प्रकरणांत तडजोड होऊन १८ कोटी ९५ लाख तीन हजार ९४ रु पये इतकी रक्कम मान्य झाली. या लोकअदालतीत भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, कलम १३८ची प्रकरणे, विवाह प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व फौजदारी अपिले, तसेच सहकार न्यायालय व कामगार न्यायालयाची अशी एकूण ६६०० प्रलंबित प्रकरणे, तसेच बँका, टेलिफोन, ग्रामपंचायती, नगरपालिका, अन्य मोबाइल कंपन्या, महावितरण अन्य वित्तीय कंपन्या आदीची एक लाख १६ हजार ४९७ वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.या लोकअदालतीत संपूर्ण जिल्ह्यात ४२ कक्ष स्थापन करून त्यातून राष्ट्रीयकृत बँका, टेलिफोन कंपनी, महावितरण, विमा कंपन्या, भूसंपादन अधिकारी तसेच विधिज्ञ मंडळ, न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला व पक्षकारांना न्याय मिळवून दिल्याची माहिती रायगड जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव एल. डी. हुली यांनी दिली आहे. 

टॅग्स :Raigadरायगड