नागोठणे - जांबोशीत पुलाच्या भरावाला पडले भगदाड
By Admin | Updated: September 25, 2016 04:07 IST2016-09-25T04:07:24+5:302016-09-25T04:07:24+5:30
मुसळधार पावसामुळे विभागात पेण तालुक्यातील जांबोशी रस्त्यावर रानपाखरं आश्रमशाळेजवळ पुलाच्या एका बाजूच्या भरावाला भगदाड पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प

नागोठणे - जांबोशीत पुलाच्या भरावाला पडले भगदाड
नागोठणे : मुसळधार पावसामुळे विभागात पेण तालुक्यातील जांबोशी रस्त्यावर रानपाखरं आश्रमशाळेजवळ पुलाच्या एका बाजूच्या भरावाला भगदाड पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. रात्री येथील बस्थानकातून जांबोशी येथे वस्तीला जाणारी नागोठणे - जांबोशी एसटी बस पुलावरून गेल्यानंतर तासाभराने पुलाच्या रस्त्याला भगदाड पडले.
वस्तीची ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे साडेसहाला जांबिशी येथून सुटत असल्याने मार्ग बंद झाल्यामुळे नागोठणेत येणारे विद्यार्थी तसेच नोकरदार वर्गाला वेळेत पोहोचणे शक्य झाले नाही. स्थानिकांच्या मदतीने भराव पुन्हा केल्यानंतर दुपारी १२ वाजता जांबोशीहून गाडी नागोठणेकडे रवाना करण्यात आली.
म्हसळेतील वरवठणे पूल धोकादायक
म्हसळ्याहून दिघी आंतरराष्ट्रीय बंदराकडे व दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिराकडे जाणाऱ्या मुख्यमार्गावरील वरवठणे गावाजवळील पुलाला धोका निर्माण झाला आहे. एकूण पाच गाळे असणाऱ्या पुलाचा तिसरा खांब पूर्णपणे जीर्ण झाला आहे. आणि कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे.
पुलाची वाहतुकीची क्षमता १५ ते २० टनाची असून दिघी बंदरातून आलेला प्लॅटिनम, कोळसा इत्यादी प्रकारची जड वाहतूक पन्नास टनापेक्षा जास्त प्रमाणात होत. त्यामुळे महाडमधील सावित्री नदीवरील पुलाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पुलामुळे पंचक्र ोशीतील गावांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्वरीत पुनर्बांधणीची मागणी होत आहे.