मुरूडची आदिवासी वाडी अंधारात
By Admin | Updated: August 29, 2015 22:14 IST2015-08-29T22:14:20+5:302015-08-29T22:14:20+5:30
देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे पूर्ण होत असतानासुद्घा काही भागात विजेची व्यवस्था पोेहोचलेली नाही. गरीब आदिवासी लोकांच्या निवेदनाकडे विद्युत मंडळाकडून वारंवार दुर्लक्ष होत

मुरूडची आदिवासी वाडी अंधारात
आगरदांडा : देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे पूर्ण होत असतानासुद्घा काही भागात विजेची व्यवस्था पोेहोचलेली नाही. गरीब आदिवासी लोकांच्या निवेदनाकडे विद्युत मंडळाकडून वारंवार दुर्लक्ष होत आहे. मुरूड तालुक्यातील वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीत सुतारमाळ आदिवासी वाडी असून इथे २५ ते ३० घरे आदिवासी कुटुंबवस्ती करून राहत आहेत. सुमारे ७० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या सुतारमाळ आदिवासी वाडीला गेली अनेक वर्षे वीज मिळालेली नाही.
मुरूड-वावडुंगी ग्रामपंचायत ही १९९२ ला निर्माण झाली आहे व त्याच्या अनेक वर्षांपासून ही कुटुंब या ठिकाणी राहत आहेत. रॉकेलच्या दिव्याखाली येथील लोक रात्र काढीत आहेत. पण काळोखात त्यांना प्रकाश अद्याप सापडत नाही. रात्र ही एवढी काळीकुट्ट असते हेच त्यांना माहित आहे. परंतु वीज नसल्यामुळे मुले येथील मोठ्या श्क्षिणापासून वंचित राहिले आहेत. परंतु महाराष्ट्र वीज मंडळ अजूनपर्यंत त्यांना प्रकाश देण्यास तयार नाही. याबाबत आमच्या प्रतिनिधीने वावडुंगी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अजित कासार यांची भेट घेतली असता ते म्हणाले की, २०११ पासून ग्रामपंचायतचे ठराव देवूनही सुतारमाळ आदिवासी वाडी प्रकाशमय करण्याची मागणी करत आहोत, परंतु वीज मंडळ अधिकारी, परिक्षण करून जातात, मात्र पुन्हा फिरकत नाही. वीजेसाठी सतत पाठपुरावा करीत आहे. वीज मंडळ अधिकारी लोकांच्या अनास्थेमुळे या सुतारमाळ आदिवासी वाडीला वीज मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे. या बाबत वीज मंडळाचे उपअभियंता लांडगे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तो होऊ शकला नाही. याबाबत लोकप्रतिनिधीनी लक्ष घालावे, अशी मागणी गा्रमस्थांकडून होत आहे. (प्रतिनिधी)