मुरुड धनगरवाडीत पिकअप टेम्पो उलटला
By Admin | Updated: February 7, 2016 00:24 IST2016-02-07T00:24:09+5:302016-02-07T00:24:09+5:30
मुरुड-धनगरवाडी रस्त्यावरील वळणदार आणि उतार असलेल्या ठिकाणी रिकामा बोलेरो पिकअपचा ऐक्सल तुटला. यावेळी पिकअप टेम्पो कलंडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले.

मुरुड धनगरवाडीत पिकअप टेम्पो उलटला
आगरदांडा : मुरुड-धनगरवाडी रस्त्यावरील वळणदार आणि उतार असलेल्या ठिकाणी रिकामा बोलेरो पिकअपचा ऐक्सल तुटला. यावेळी पिकअप टेम्पो कलंडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने गाडीतील चालक सुखरूप आहे.
रोहा येथून रिकामा बोलेरो पिकअप (एमएच०६-बीजी-११०६) मुरुडकडे जात असताना दुपारी उतारावरील गाडीचा अचानक एक्सेल तुटल्यामुळे तसेच ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी कलंडली. यामध्ये चालक यशवंत हिरवे हा किरकोळ जखमी झाला असून, गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मुरुड-धनगरवाडी येथे अपघाताचे सत्र सुरूच आहे. मुरुड -धनगरवाडी येथे गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यालगत सुरक्षा कठडा बांधण्यात आलेला नाही. येथे सुरक्षा कठडा नसल्याने व छोटे वळण व उतरण असल्याने यापूर्वी याच ठिकाणी अनेक वेळा अपघात झाले आहेत. धोकादायक वळण असल्यामुळे प्रत्येक वळणावर सूचना फलकाची गरज असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)