पत्नीची चारित्र्याच्या संशयावरून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 02:59 IST2018-05-15T02:59:58+5:302018-05-15T02:59:58+5:30

कर्जत तालुक्यातील दहिवली येथील इंदिरानगर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केला आणि तिचा मृतदेह घरातच खड्डा खोदून पुरला.

Murder of wife's character | पत्नीची चारित्र्याच्या संशयावरून हत्या

पत्नीची चारित्र्याच्या संशयावरून हत्या

कर्जत : कर्जत तालुक्यातील दहिवली येथील इंदिरानगर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केला आणि तिचा मृतदेह घरातच खड्डा खोदून पुरला. त्यानंतर १५ दिवसांनी पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत राहुल शिरसाठ याने पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनंतर हे प्रकरण उघडकीस आले.
मुंबई येथे राहणारा राहुल शिरसाठ याचा मामा संतोष गोविंद कसबे हा त्याच्या कुटुंबीयांसोबत कर्जत नगरपरिषद हद्दीतील इंदिरानगर येथे राहतो. राहुल १२ मे रोजी कसबेकडे गेला असता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. याबाबत राहुलने कर्जत पोलीस ठाण्यात माहिती दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी आपल्या पोलीस कर्मचाºयांसह घटनास्थळी तपासणी केली असता, कसबेची सुसाईड नोट सापडली. यात पत्नी मनीषा हिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करून तिला काही दिवसांपूर्वी ठार मारून मृतदेह घरातच गाडल्याचे नमूद करण्यात आले होते.
पंधरा दिवसांपूर्वीही राहुल पत्नी व मेव्हणीसह दहिवलीत आला असता, मामी मनीषा दिसली नसल्याने त्याचे चौकशी केली असता, ती भांडण करून निघून गेल्याचे कसबेने सांगितले. त्यानंतर राहुल कसबेच्या चारही मुलांना घेऊन भिवंडी येथील घरी गेला. त्यानंतरही त्याने अनेकदा कसबेकडे त्याच्या पत्नीबाबत चौकशी केली. मात्र त्याने प्रत्येकवेळी उडवाउडवीचे उत्तर दिल्याचे राहुलने पोलिसांना सांगितले.
>कर्जत पोलिसांत गुन्हा
कर्जत पोलिसांनी चिठ्ठीच्या आधारे घरात तपास सुरू केला. यावेळी सिमेंटचा नवीन कोबा केल्याचे आढळल्याने खोदकाम केले असता मनीषाचा मृतदेह आढळला. कर्जत पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Murder of wife's character