क्षुल्लक कारणातून वृद्धाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:02 IST2020-02-16T01:02:34+5:302020-02-16T01:02:41+5:30

दासगावमधील घटनेने खळबळ । खुनाची घटना सीसीटीव्हीत कैद

The murder of an old man for trivial reasons | क्षुल्लक कारणातून वृद्धाचा खून

क्षुल्लक कारणातून वृद्धाचा खून

दासगाव : दासगाव गावामध्ये एका मद्याच्या दुकानात क्षुल्लक कारणातून झालेल्या वादाचा राग मनात धरून शुक्रवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास एका वृद्धाचा त्याच गावातील एका तरुणाने खून केला आहे. ही घटना सीसीटीव्हीतकैद झाली आहे. या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

महाडमधील दासगाव गावात एका मद्याच्या दुकानावर काम करत असलेल्या वृद्धाचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. खुनाची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्या आधारेच महाड शहर पोलिसांनी गावातील मयूरेश उर्फ लक्ष्या पड्याळ या तरुणाला ताब्यात घेतले आहे. मयूरेश उर्फ लक्ष्या गोविंद पड्याळ (२७) हा आणि दिलीप दगडू साळवी यांच्यामध्ये शुक्रवारी रात्री १०:१५ ते १०:३० च्या सुमारास सिगारेटच्या पैशावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात ठेवून मयूरेश याने रात्री धारदार शस्त्राने दिलीप साळवी यांचा गळा चिरून खून केला. दिलीप साळवी हे मूळ राहणार कुंबळे येथील असून, दासगाव येथे मद्यविक्रीच्या दुकानावर काम करत होते. याच ठिकाणी दुकानासमोर ते झोपले असताना मयूरेश याने हे कृत्य केले. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. मद्य दुकानावर काम करणारे नूर हमजा भाटकर यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली.

पोलिसात गुन्हा दाखल
मयूरेश पड्याळच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस हे करीत आहेत.

Web Title: The murder of an old man for trivial reasons

टॅग्स :Raigadरायगड