सेंट्रल पार्क नव्हे मुर्बी गाव स्टेशन; मेट्रो स्थानकाच्या नावासाठी ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण

By वैभव गायकर | Published: October 13, 2023 08:17 PM2023-10-13T20:17:58+5:302023-10-13T20:19:43+5:30

सिडको प्रशासनाचा व्यक्त केला निषेध

Murbi Gaon Station not Central Park; Symbolic hunger strike by villagers for metro station name | सेंट्रल पार्क नव्हे मुर्बी गाव स्टेशन; मेट्रो स्थानकाच्या नावासाठी ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण

सेंट्रल पार्क नव्हे मुर्बी गाव स्टेशन; मेट्रो स्थानकाच्या नावासाठी ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: सिडकोच्या मेट्रोच्या बेलापुर ते पेंधर या पहिल्या टप्प्याचे काम पुर्ण झाले आहे.उदघाटनाची प्रतिक्षात असलेल्या मेट्रोने या पहिल्या टप्प्यातील स्थानकांना त्या त्या गावांची अथवा जागेची नावे देऊ केली आहेत.मात्र यापैकीं मुर्बी गावाजवळील स्थानकाला सिडकोने गावाचे नाव न देता सेंट्रल पार्कचे नाव देऊ केल्याने मुर्बी ग्रामस्थांनी याला विरोध दर्शवत आज लाक्षणिक उपोषण पुकारत सिडको प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

या मागणीसाठी ग्रामस्थ मंडळ मुर्बी मधील रहिवासी मोठ्या संख्येने एकवटले होते.सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकातच मुर्बी ग्रामस्थांनी ठिय्या देत हे लाक्षणिक उपोषम पुकारले होते.मुर्बी ग्रामस्थांच्या वतीने जगदीश ठाकुर यांनी याबाबत पुढाकार घेत या आंदोलनाचे नेतृत्व केले.या लाक्षणिक उपोषणाला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.कामगार नेते ऍडव्होकेट सुरेश ठाकुर यांनी देखील या आंदोलकांची भेट घेत त्यांचे मनोबल  वाढविले.

11 स्थानकांपैकी 6 स्थानकांना गावांची नावे दिलेली असताना मुर्बी गावाला यातुन का वगळले असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.स्थानकाला मुर्बी गावाचे नाव देण्यसाठी ग्रामस्थ सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

Web Title: Murbi Gaon Station not Central Park; Symbolic hunger strike by villagers for metro station name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.