नगरपरिषद निवडणुकीची उत्सुकता

By Admin | Updated: November 10, 2016 03:34 IST2016-11-10T03:34:47+5:302016-11-10T03:34:47+5:30

मुरुड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामागचे कारणही तसेच आहे. राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक फुटून त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

Municipal election euphoria | नगरपरिषद निवडणुकीची उत्सुकता

नगरपरिषद निवडणुकीची उत्सुकता

नांदगाव/ मुरुड : मुरुड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामागचे कारणही तसेच आहे. राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक फुटून त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. तर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या स्नेहा किशोर पाटील या नगराध्यक्षा म्हणून विराजमान झाल्यावर त्यांनी सुद्धा आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेची ताकद शहरात वाढली आहे. त्यामुळे आघाडी केलेल्या राष्ट्रवादी, शेकाप व काँग्रेस आय पक्ष कशी लढत होते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मुरुड नगरपरिषदेच्या या निवडणुकीत ४९८४ महिला तर ५२१८ पुरु ष मतदान करणार आहेत. एकंदर शहरातील १० हजार २०२ मतदाते मतदान करणार आहेत. प्रभाग क्र मांक १ मध्ये भोगेश्वर आळी, खांजादा यांचे निवासस्थान, उजव्या बाजूने भगत पॅरॅडाईस इमारतीपर्यंत, दत्त मंदिर परिसर,एसटी आगार परिसर,शेगवाडा नाका आदी भूभाग येत असून येथे हा प्रभाग १ (अ) हा इमाव महिलांसाठी राखीव तर १ (ब) हा खुला प्रवर्ग आहे. या प्रभागात ५७५ महिला तर ५७० पुरु ष मतदाते आहेत. प्रभाग क्र मांक २ मध्ये दत्त मंदिर रस्ता ते उजव्या बाजूने माजी आमदार डी.एन.चौलकर यांच्या निवास्थानापर्यंत कुंभारवाडा ते माजी उपनगराध्यक्ष अतिक खतीब यांच्या निवासस्थानापर्यंत व भोगेश्वर आळीतील काही भाग समाविष्ट होत आहे. प्रभाग २(अ) हा महिलांसाठी खुला प्रवर्ग म्हणून आहे. तर २(ब) हा खुला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे. येथे ६४२ महिला तर ६६३ पुरु ष मतदान करणार आहेत.
प्रभाग ३ मध्ये नाभिक समाजमंदिर परिसर, मिठागर नाका, जुनी पेठ परिसरातील विठ्ठल मंदिर परिसर, व कुंभारवाड्यातील काही भागाचा समावेश होत आहे. प्रभाग ३ (अ) हा इमाव सर्वसाधारणसाठी आरक्षित असून ३ (ब) हा महिलांसाठी खुला प्रवर्ग म्हणून आरक्षित आहे. या प्रभागात ६३९ महिला तर ६६८ पुरु ष मतदान करणार आहेत. प्रभाग ४ मध्ये लक्ष्मीखार परिसर, नगरपरिषद खाजण जमीन परिसर, हिंदू स्मशानभूमी परिसर, गावदेवी पाखाडी, दस्तुरी नाका आदी भूभाग येत आहेत. प्रभाग ४ मध्ये ८६६ महिला तर ७२७ पुरु ष मतदान करणार आहेत. प्रभाग ५ मध्ये मिलबार नाका, पंडित नेहरू मार्ग, रणदिवे आळी, मसाल गल्ली, दक्षिण बाजूकडील खाजण भाग येथे ६१० महिला तर ६४० पुरु ष मतदाते आहेत. प्रभाग ६ मध्ये कोटेश्वरी मंदिर, पोलीस वसाहत, शेखांनी इमारत, लोकमान्य टिळक रस्ता, येथे ५०९ महिला तर ५४१ पुरु ष मतदाते आहेत. प्रभाग ७ मध्ये समुद्रकिनारा ते जलाल पांगारकर यांचे घर, सर एस हायस्कूलमागील बाजूने कोळीवाडा परिसर ते मासळी मार्केट हद्द येथे ५०३ महिला तर ५५० पुरु ष मतदाते आहेत. प्रभाग ८ मध्ये बाजारपेठ,व्यापारी बँक परिसर, मुस्लीम कब्रस्थान, कस्टम कार्यालय परिसर येथे ८२० महिला तर ८५९ पुरु ष मतदाते आहेत.

Web Title: Municipal election euphoria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.