शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

अपघात टाळण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पहिल्या लेन मध्ये कमी वेगाने वाहन चालविण्यास मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 19:18 IST

यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे दृतगती महामार्गावरील पहिल्या लेन मधुन प्रवास करतांना विहित ताशी ८० किमी गतीपेक्षा कमी वेगाने वाहन चालविण्यास मनाई करणारी अधिसुचना राज्याच्या वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक आर.के.पद्मनाभन यांनी जारी केली आहे.

- जयंत धुळप

रायगड -  यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे दृतगती महामार्गावरील पहिल्या लेन मधुन प्रवास करतांना विहित ताशी ८० किमी गतीपेक्षा कमी वेगाने वाहन चालविण्यास मनाई करणारी अधिसुचना राज्याच्या वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक आर.के.पद्मनाभन यांनी जारी केली आहे.

उजवीकडील लेन कायम रिकामी ठेवणे आवश्यक 

यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे दृतगती महामार्गावरील अपघात व वाहतूक कोंडी होवू नये यासाठी दृतगती महामार्गावरील प्रत्येक वाहिनीत तीन लेन आहेत. त्यापैकी कार,जीप, टेम्पो या हलक्या वाहनांनी दृतगती महामार्गाच्या मध्य लेन मधून, जड-अवजड वाहनांनी सर्व्हीस लेनला लागून असलेल्या सर्वात डावीकडील लेन मधून प्रवास करणे अपेक्षीत असते. तसेच त्यांनी केवळ पुढील वाहनास ओलांडतांना (ओव्हरटेक करताना) उजवीकडील लेनचा अवलंब करु न लेन मधून उजवीकडील लेन कायम रिकामी ठेवणे आवश्यक आहे. 

पहिल्या लेन मध्ये कमी वेगाने वाहन चालविण्याने अपघात 

पहिली लेन ही ओव्हरटेक करीता आहे. तथापि बरीच वाहने पहिल्या लेन मधून प्रवास करतांना आवश्यक असणा:या विहीत ताशी ८० कि.मी.गतीचा वापर न करता त्यापेक्षा कमी गतीने वाहने चालवितात. त्यामुळे पाठीमागून येणा:या चालकांना वाहन चालविण्यास अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची दाट शक्यता असते. दृतगती महामार्गावर अपघात आणि वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी तसेच लेनच्या शिस्तीचे पालन करणे यासाठी मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ अन्वये अपर पोलीस महासंचालक (वाहतूक)आर.के.पद्मनाभन यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. 

अत्यावश्यक सेवावाहनांना सूट

या अधिसुचनेअन्वये रायगड व पुणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे व पुणे-मुंबई दृतगती महामार्गावर उजवीकडून लेन ओव्हर टेकींगसाठी राखीव असल्यामुळे पहिल्या लेनमधून प्रवास करतांना विहीत गतीपेक्षा कमी गतीने वाहन  चालविण्यास हा मनाई आदेश जारी  करण्यात आला  आहे. या मनाई आदेशातून अत्यावश्यक सेवावाहने, रु ग्णवाहिका,अग्निशमन वाहने, पोलीस व शासकीय वाहने यांना वगळण्यात आले आहे.

सुयोग्य सुचना लावण्याचे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळास निर्देष

अधिसूचनेत नमूद केल्यानुसार, उजवी लेन ही हलक्या वाहनांच्या ओव्हर टेकींगसाठी राखीव असून कमी गतीने वाहन चालविण्यास मनाई असल्या बाबत टोल तिकीटावर अटी व शर्ती म्हणून लेखी स्वरु पात नमूद करावी. तसेच या बाबत बोर्ड, चिन्हे, फलक व तत्सम सूचना योग्य ठिकाणी लावण्याबाबतची अंमलबजावणी  महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. अधिसूचना पुढील आदेश निर्गिमत होईपर्यंत लागू राहील, असे आवाहन पद्मनाभन यांनी केले आहे.

टॅग्स :Mumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेnewsबातम्या