पाली-खोपोली मार्गावर चिखल
By Admin | Updated: June 14, 2016 01:05 IST2016-06-14T01:05:47+5:302016-06-14T01:05:47+5:30
पाली - खोपोली महामार्ग अरु ंद असल्याने नेहमी अपघात होत असतात. हे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने साईडपट्टी वाढविण्यासाठी रस्त्याचा दोन्ही बाजूला मातीचा भराव

पाली-खोपोली मार्गावर चिखल
पाली : पाली - खोपोली महामार्ग अरु ंद असल्याने नेहमी अपघात होत असतात. हे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने साईडपट्टी वाढविण्यासाठी रस्त्याचा दोन्ही बाजूला मातीचा भराव केला आहे, परंतु हा भराव करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी ठेकेदारास कंत्राट दिले होते. ठेकेदाराने काम वेळेवर पूर्ण न केल्याने रस्त्यालगत असलेले मातीचे ढिगारे व केलेली साईडपट्टीची माती पावसाच्या पाण्यामुळे ओली होऊन रस्त्यावर चिखल झाला आहे. यामुळे गाडीचे चाक घसरून अपघात होण्याची शक्यता आहे.
चिखल कधी साफ होणार याबाबत बांधकाम विभाग उपअभियंता चव्हाण यांना विचारणा केली असता, आम्ही ठेकेदारास माती भरावाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करायला सांगितले होते, परंतु ठेकेदाराने काम वेळेत पूर्ण न केल्याने रस्त्याच्या कडेला चिखल झाला आहे. रस्त्यावरील चिखल साफ करण्यास सांगितले असून काम वेळेत पूर्ण न केल्याने ठेकेदारावर कारवाई करु.