शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

पनवेल, माणगावमध्ये आंदोलन शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 22:32 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध : निषेध फलक झळकावून घोषणाबाजी; हजारो नागरिकांचा सहभाग

कळंबोली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा संसदेत मंजूर करून पास करण्यात आला. परंतु कायद्याविरोधाचे देशभरातील वातावरण तापले आहे. शुक्रवारी पनवेल शहरातील मुस्लीम समाजाने कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी आंदोलन केले. यावेळी पाच हजारांपेक्षा जास्त मुस्लीम बांधव उपस्थित होते.

तळोजात या कायद्याविरोधात दोन दिवसांपूर्वी मुस्लीम बांधव रस्त्यावर उतरले होते. शुक्रवारी पनवेल शहरातील पटेल, कच्छी मोहल्ला, मुस्लीम नाका, भारत नगर येथील मुस्लिमांनी आंदोलन केले. त्यांनी महापालिकेच्या मैदानावर केंद्र्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. वेगवेगळे फलक झळकवून कायद्याला विरोध केला.

कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून पनवेल शहर पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे मुस्लीम बांधवांचा मोर्चा पनवेल महापालिकेजवळ थांबला. त्यामुळे तो तहसील कार्यालयापर्यंत जाऊ शकला नाही. शिष्टमंडळाने जाऊन तहसीलदारांना निवेदन सादर केले. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने झाले. कुठे अप्रिय घटना घडली नाही.

बहुजन क्रांती मोर्चातर्फे धरणेपनवेल : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पोलीस चौकीजवळ बहुजन क्रांती मोर्चातर्फे एकदिवसीय धरणे आंदोलन शुक्रवारी करण्यात आले. शहरातील शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करून बहुजन क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी केब आणि एनआरसीच्या विरोधात घोषणा दिल्या. हा कायदा म्हणजे संविधानाचे उल्लंघन असल्याचे यावेळी सांगण्यात आले.केंद्र शासनाने नागरिकत्वाची जी दुरुस्ती केली आहे, ती भारतीयांवर अन्यायकारक आहे. याबाबत अगोदर जनजागृती करणे गरजेचे होते. तसे न करता बहुमताच्या जोरावर हा कायदा पास करण्यात आला. याबाबत लोकांना कोणतीही माहिती नाही. तसेच त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याने आम्ही आंदोलन केले.- लतीफ शेख, अध्यक्ष, पनवेल शहर काँग्रेस