नवीन वीज कनेक्शन दिल्यास आंदोलन

By Admin | Updated: June 1, 2016 02:45 IST2016-06-01T02:45:42+5:302016-06-01T02:45:42+5:30

मुरु ड तालुक्यात प्रचंड प्रमाणात विजेचा अल्प तुटवडा होत असताना देखील मुरु ड वीज कार्यालय धनिकांना मोठ्या प्रमाणावर वीज क्षमता असणाऱ्या वीज वाहिनी दिल्या जात आहेत.

Movement if new power connection is given | नवीन वीज कनेक्शन दिल्यास आंदोलन

नवीन वीज कनेक्शन दिल्यास आंदोलन

मुरु ड/नांदगाव : मुरु ड तालुक्यात प्रचंड प्रमाणात विजेचा अल्प तुटवडा होत असताना देखील मुरु ड वीज कार्यालय धनिकांना मोठ्या प्रमाणावर वीज क्षमता असणाऱ्या वीज वाहिनी दिल्या जात आहेत. तर एकीकडे विजेचा पुरवठा योग्य पध्दतीने होत नसूनही वीजबिल वाढत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कमी दाबाने वीजपुरवठा का होत आहे याचे, साधे उत्तर कार्यालयाला देता येत नाही. जोपर्यंत मुरु ड सबस्टेशनचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत नवीन वीज कनेक्शन देऊ नका अन्यथा सर्वपक्षीय जनआंदोलन छेडू, असा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष नितेश देशपांडे यांनी दिला आहे. नितेश देशपांडे म्हणाले की, सध्या मुरु ड तालुक्याला ११० अशा कमी प्रमाणात वीजपुरवठा झाल्याने झेरॉक्स मशिन चालत नाही. पंख्याला वेग नाही तर एसी लावता येत नाही, यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. परंतु वीज मंडळास याचे काही वाटत नाही. नांदगाव येथे श्रीमंत व्यक्तीस मोठ्या क्षमतेची वीज वाहिनी देऊन स्थानिकांना त्रास देण्याचे काम करीत आहेत, असा आरोप देशपांडे यांनी के ला असून,जर नवीन वीज कनेक्शन द्याल तर जनांदोलन’ छेडू असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

Web Title: Movement if new power connection is given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.