शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

कुंभार समाजासाठी ‘माती कला बोर्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 6:30 AM

कुंभार समाजातील लुप्त होत चाललेल्या कलेला वाव देण्यासाठी आता लवकरच केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासमवेत बैठक आयोजित केल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली.

ठाणे  - कुंभार समाजातील लुप्त होत चाललेल्या कलेला वाव देण्यासाठी आता लवकरच केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासमवेत बैठक आयोजित केल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली. गुजरात राज्याच्या धर्तीवर संपूर्ण राज्यभर माती कला बोर्ड स्थापन करण्याच्या त्यांच्या मागणीला प्रभू यांनी सहमती दर्शवली असून त्यासंदर्भात लवकरच बैठक आयोजिली आहे.कुंभार समाजाच्या कला सध्या लुप्त होत चालल्या आहेत. त्यांचा रोजगारदेखील काळाच्या पडद्याआड जाऊ लागला आहे. त्यामुळे त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि त्यांची कला जिवंत राहावी, यासाठी विचारे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. संपूर्ण देशात आजघडीला सुमारे दोन कोटी कुंभारबांधव आहेत. परंतु, त्यांना आजही रोजगारासाठी झगडावे लागत आहे. राज्यातदेखील शासनाकडून नव्या काही योजना या समाजासाठी हाती घेण्यात आलेल्या नाहीत. रोजगार न मिळाल्याने हा समाज दिशाहीन होऊ लागला आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये मात्र या समाजबांधवांसाठी रोजगाराच्या विविध संधी तेथील सरकारने दिल्या आहेत. गुजरातने मातीकाम कलाकार अ‍ॅण्ड रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट गांधीनगरद्वारे परंपरागत कुंभार कलेला वाव देण्यासाठी विविध साहित्य उपलब्ध करून दिले आहे.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या