शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींसोबत जॉर्जिया मेलोनींचा खास सेल्फी; दोन्ही नेत्यांमध्ये 'या' मुद्द्यांवर चर्चा
2
दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन
3
वहीतुला करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पारड्यातून पडले; व्हिडीओ व्हायरल
4
पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपले! अक्रमकडून पाकिस्तानी खेळाडूंचा 'करेक्ट कार्यक्रम'
5
चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव
6
ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त
7
"कुर्बानी के जानवर हाजीर हो", पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर; माजी खेळाडूची बोचरी टीका
8
मराठी अभिनेत्रीसाठी सचिन तेंडुलकरच्या लेकाची पोस्ट, फोटो शेअर करत अर्जुन म्हणतो...
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आजपासून 'या' ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती घटणार
10
"वक्तव्य होत असतात, राम सर्वांचे आणि राष्ट्र..."; RSS नेते इंद्रेश कुमार यांच्या विधानावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया
11
ऐश्वर्या नाही तर सलमान खान या अभिनेत्रीसोबत थाटणार होता संसार, कोण आहे ती?
12
अफगाणिस्तान सुपर-८ मध्ये पोहोचला; पण स्टार स्पिनर T20 World Cup मधून बाहेर झाला
13
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
14
फुटबॉलचा Mini World Cup! यजमान जर्मनीची विजयी सलामी; स्कॉटलंडचा दारूण पराभव 
15
सबाच्या करिअरमध्ये हृतिकचा अडथळा?; दोन वर्ष मिळालं नाही काम, म्हणाली...
16
WHAT A MATCH! आफ्रिकेला आशियाई संघानं घाम फोडला; मोठा उलटफेर होण्यासाठी १ धाव कमी पडली
17
न्यूझीलंडचा ८८ चेंडू राखून विजय! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण अखेर विजयाचे खाते उघडले
18
कॅलिफोर्नियातील PNG ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा, २० दरोडेखोर आले, दोन मिनिटांत सराफा दुकान साफ केले
19
आजचे राशीभविष्य - शनिवार १५ जून २०२४; यश, कीर्ती आणि प्रतिष्ठेत वाढ होईल, आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल
20
40 ALL OUT! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नवख्या संघाला लोळवलं

बहुचर्चित शिवस्मारक फेबु्रवारीत खुले होणार?; पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 10:59 PM

३० कोटींचा खर्च । २० मीटर उंचीचे स्मारक पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनणार

मधुकर ठाकूर उरण : तीस कोटी खर्चून जेएनपीटीकडून रायगड जिल्ह्यातील उरण येथे उभारण्यात येत असलेल्या २० मीटर उंचीच्या बहुचर्चित शिवस्मारकाचे काम जानेवारी महिन्याअखेरीस पूर्णत्वास येणार आहे. विविध सुविधा असलेल्या स्मारकाची दोन वर्षांपासून सर्वांनाच प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्यामुळे येत्या फेब्रुवारीत सर्वांसाठी खुले होणारे शिवस्मारक देशभरातील शिवप्रेमी, दासभक्त, पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनण्याची शक्यता आहे.

उरण तालुक्यातील जासई-दास्तानफाटा दरम्यान जेएनपीटी प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी १९.३ मीटर उंचीचे शिवस्मारक उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. नऊ हजार चौरस मीटर क्षेत्रात हे शिवस्मारक उभारण्यात आले आहे. पाच मजल्यापर्यंत उभारण्यात आलेल्या तळ मजल्यावर ४८० चौरस मीटरचे बहु-उद्देशीय सभागृह आहे. सभागृहात कॅन्टीन, ग्रीनरूम आणि संग्रहालय उभारण्यात आले आहे. संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक वस्तू ठेवण्यात येणार आहेत.

पहिल्या मजल्यावर दोन खुल्या बाल्कनी असून, येथून चहूबाजूंचा निसर्गमय परिसर न्याहाळता येणार आहे. दुसऱ्या मजल्यावर एक्झिबिशन हॉलची निर्मिती करण्यात आली आहे. हॉलमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक ऐतिहासिक चित्र, शिल्प, पेंटिंगचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. तिसºया आणि चौथ्या मजल्यावर व्हूज गॅलरी आणि महाराजांच्या जीवनपटावर ऑडिओ व्हिज्युअल सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे. आॅडिओ व्हिज्युअल मिनी थिएटरमध्ये प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था असेल. स्टेजच्याच मागे एमपी थिएटर उभारण्यात आले आहे.१९.३ मी. उंचीचे राज्यातील एकमेव स्मारकपाचव्या आणि अखेरच्या मजल्यावर सहा मीटर उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि चार मीटर उंचीचा समर्थ रामदास स्वामी यांचा अष्टधातूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या या स्मारकाची तळमजल्यापासून उंची १९.३ मीटर आहे. राज्यातील इतक्या मोठ्या उंचीचे हे एकमेव स्मारक असल्याचे जेएनपीटी प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तत्कालीन जेएनपीटी ट्रस्टी आणि आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यामुळे हे भव्य स्मारक उदयास आले आहे.शिवस्मारकाचे काम जानेवारी महिन्याअखेरीस पूर्णत्वास जाणार आहे. तसेच येत्या फेब्रुवारी महिन्यात सर्वांसाठी खुले करण्यात येईल. मात्र, याबाबत अद्यापही तिथी, वार, तारीख ठरवण्यात आलेली नसून नौकानयन मंत्रालयाकडूनच निश्चित कार्यक्रम ठरविण्यात येणार असल्याचे जेएनपीटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.शिवस्मारकाचे काम पूर्ण करण्याची मुदत फेब्रुवारी २०१९ होती. मात्र, काम अपूर्ण असतानाही १७ फेब्रुवारी २०१९ रोजी शिवस्मारकाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात आणि लाखो दासभक्तांच्या उपस्थितीत १७ फेब्रुवारी २०१९ रोजी करण्यात आले होते. स्मारकाचे काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात येऊ नये, यासाठी स्थानिक राजकीय स्तरावरून विरोधही करण्यात आला होता.

टॅग्स :Shiv Smarakशिवस्मारक