क्रीडा प्रशिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

By Admin | Updated: September 23, 2015 04:11 IST2015-09-23T04:11:04+5:302015-09-23T04:11:04+5:30

ऐरोली-ठाणे येथील काही विद्यार्थीनींना पुण्यामध्ये क्रिडा स्पर्धांसाठी घेवून गेलेल्या प्रशिक्षकाने मद्यधुंद अवस्थेत परतीच्या प्रवासादरम्यान द्रुतगती महामार्गावर असणाऱ्या हॉटेलमध्ये

Molestation of sportsmanship by sports coach | क्रीडा प्रशिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

क्रीडा प्रशिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

खालापूर : ऐरोली-ठाणे येथील काही विद्यार्थीनींना पुण्यामध्ये क्रिडा स्पर्धांसाठी घेवून गेलेल्या प्रशिक्षकाने मद्यधुंद अवस्थेत परतीच्या प्रवासादरम्यान द्रुतगती महामार्गावर असणाऱ्या हॉटेलमध्ये अल्पोपहारासाठी थांबल्यावर या विद्यार्थीनीबरोबर अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मद्याच्या अमलाखाली या प्रशिक्षकाला कसलेच भान राहिले नाही. या प्रकारामुळे भेदरलेल्या विद्यार्थ्यांनींनी घडलेला प्रकार घरी सांगितल्याने या मुलींच्या पालकांनी या प्रशिक्षकाविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात तक्र ार दिली असून या प्रशिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र ही घटना खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडल्याने गुन्ह्याचा तपास खोपोली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रशिक्षकास मंगळवारी (२२ सप्टेंबर) अलिबाग न्यायालयात हजर करण्यात आले.
ही घटना रविवारी (२० सप्टेंबर) घडली. ऐरोली येथील सेंट झेवियर्स विद्यालयातील काही विद्यार्थीनी क्रीडा स्पर्धेसाठी पुणे येथे प्रशिक्षक विश्वास भादे याच्यासोबत गेल्या होत्या. या स्पर्धा उरकून या विद्यार्थीनी परतीचा प्रवास करत खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मॅकडोनाल्ड हॉटेल येथे अल्पोपहारासाठी त्यांची बस थांबली. यावेळी विश्वास भादेने मद्यधुंद अवस्थेत बसमधील विद्यार्थींनीबरोबर छेडछाड करण्यास सुरुवात केली.
भेदरलेल्या विद्यार्थीनींनी हा सगळा प्रकार घरी पोहोचल्यानंतर आपल्या घरातील मंडळींना सांगितला. (वार्ताहर)

Web Title: Molestation of sportsmanship by sports coach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.