विद्यार्थिनीचा विनयभंग
By Admin | Updated: April 29, 2017 01:44 IST2017-04-29T01:44:23+5:302017-04-29T01:44:23+5:30
महाड तालुक्यातील आंबिवली येथील जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनीचा मुख्याध्यापकाने विनयभंग के ला. या प्रकरणी

विद्यार्थिनीचा विनयभंग
महाड : महाड तालुक्यातील आंबिवली येथील जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनीचा मुख्याध्यापकाने विनयभंग के ला. या प्रकरणी गुन्हा दाखल नसला तरी पंचायत समितीने या प्रकाराची गंभीर दखल घेत या शिक्षकाच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. मात्र, महिनाभरानंतरही जिल्हा परिषदेने कोणतीही कारवाई न के ल्यानेग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पुंडलिक तरडे ( मूळ रा. तरडेवाडी, ता.महाड ) असे या शिक्षकाचे नाव आहे. मार्च महिन्यामध्ये तरडे याने या अल्पवयीन मुलीबरोबर अश्लील वर्तन केले. या प्रकाराची माहिती या मुलीचे पालक आणि ग्रामस्थांना समजल्यानंतर १ एप्रिल रोजी या प्रकाराची तक्र ार महाड पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी पालकर यांच्याकडे केली. पालकर यांनी यांनी त्याच दिवशी निलंबनाचा प्रस्ताव जि. प. शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. मात्र, जि.प.कडून कारवाई नाही.