अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By Admin | Updated: July 4, 2017 05:24 IST2017-07-04T05:24:02+5:302017-07-04T05:24:02+5:30
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हिराकोट तलाव परिसरात रविवारी रात्री अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी

अल्पवयीन मुलीचा विनयभंग
विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हिराकोट तलाव परिसरात रविवारी रात्री अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी चौघांवर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी रात्री ८.४५ वाजता एमएच-०४/बीएस-७३० या कारमधून चौघे तरुण आले होते. या
वेळी त्यातील एकाने या अल्पवयीन मुलीस इतर मित्रांची ओळख करून दिली. या वेळी या मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, अशा पद्धतीने बोलून विनयभंग केला असल्याचे अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या
प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.