शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
3
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
4
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
5
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!
9
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
11
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
12
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
13
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
14
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
15
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
16
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
17
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
18
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
19
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!

मनसे स्वाभिमान गहाण टाकणार नाही; राज ठाकरे यांनी कर्जतमध्ये मांडली रोखठोक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 06:43 IST

"आताचे सरकार म्हणजे  ‘सहारा’ चळवळ"

लोकमत न्यूज नेटवर्क, कर्जत/ नेरळ: आताचे सरकार म्हणजे सहकार चळवळ नाही तर ती सहारा चळवळ आहे. सध्या सगळे एकमेकांना सहारा देत सरकार पुढे ढकलत आहेत, अशी टीका करीत आपली महानंदा अमुल गिळंकृत करते की काय, अशी खंत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे व्यक्त केली. कर्जत तालुक्यातील नेरळ धामोते येथील एका रिसॉर्टवर मनसेच्या सहकार सेनेचे दोन दिवसीय मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर मनसेच्या सरचिटणीस तथा मनसे चित्रपट सेना कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे, सरचिटणीस रिटा गुप्ता, ज्येष्ठ नेते नितीन सरदेसाई, सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे, कामगार सेनेचे शिरीष सावंत, राजा चौगुले, मनसे सरचिटणीस तथा शेतकरी सेना अध्यक्ष संतोष नागरगोजे, अनुसया माजगावकर रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रविरोधी सहकार चळवळ थांबायला हवी

राज ठाकरे यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा दाखला देत नवी मुंबई विमानतळ आणि न्हावा शेवा शिवडी सागरी सेतू असे प्रकल्प उभे राहत आहेत. मात्र यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीच गेल्या. पण प्रकल्पाच्या आजूबाजूच्या जमिनी कोणी विकत घेतल्या हे देखील पहावे लागेल, असे सांगत ही महाराष्ट्र विरोधी सहकार चळवळ थांबायला हवी. नाही तर मनसेचे कार्यकर्ते ती मोडीत काढतील, असा इशाराही दिला. 

मनसे स्वाभिमान गहाण टाकणार नाही

मराठी उद्योजकांना मदतीचा हात द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यमान सरकारवर टीका केली. आपल्याकडचे नेते मिंधे झाले आहेत. तेव्हा ते तुमची बाजू उचलून धरतील, या आशेवर बसू नका. ते फक्त इकडून तिकडे  उड्या मारतात. या मिंध्या नेत्यांनी त्यांची मने, स्वाभिमान गहाण टाकला आहे. मात्र मनसे स्वाभिमान गहाण टाकणार नाही, असे यावेळी त्यांनी आश्वासित केले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे