शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
5
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
6
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
7
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
8
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
9
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
10
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
11
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
12
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
13
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
14
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
15
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
16
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
17
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
18
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
19
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
20
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भरला एक हजाराचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 16:49 IST

राे-राे व्यवस्थापनाकडून मास्क लावण्याबाबत, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखण्याबाबत ध्वनी क्षेपकावरून सूचना देण्यात येत हाेत्या. 

रायगड : काेराेनाच्या कालावधीमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मास्क न लावल्यामुळे त्यांना एक हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे. राज ठाकरे हे एका खासगी कामानिमित्त मांडवा येथे शुक्रवारी भाऊचा धक्का ते मांडवा या राेराे सेवेने येत हाेते. त्यावेळी ठाकरे यांनी मास्क लावला नव्हता. त्याच वेळी राे-राे व्यवस्थापनाकडून मास्क लावण्याबाबत, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखण्याबाबत ध्वनी क्षेपकावरून सूचना देण्यात येत हाेत्या. काेराेनाचा प्रादुर्भाव राेखणाऱ्या सूचना कानावर पडताच ठाकरे यांना त्यांची चूक उमगली. नियम माेडल्याने याबाबत काही दंड आहे का, अशी विचारणा ठाकरे यांनी शेजारीच असणाऱ्या राे-राे व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्याला केली. ताेंडाला मास्क न लावणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड आहे, असे संबंधित कर्मचाऱ्याने ठाकरे यांना सांगितले.

ठाकरे यांनी तातडीने एक हजार रुपयांचा दंड भरला. ठाकरे मांडवा येथे उतरून आपल्या वाहनाने पुढील प्रवासाला निघून गेले. त्यावेळीही त्यांच्या ताेंडाला मास्क लावलेला हाेता. दरम्यान, काेराेनाबाबतचे नियम घालून सर्वच प्रकारच्या प्रवासी वाहतूकीला सरकारने परवानगी दिली आहे. राेराे प्रशासनालाही याच अटी आणि शर्थींवर परवानगी दिली आहे. त्यांनी नियमानुसारच कारवाई केली आहे.मनसेकडून स्पष्टीकरणया घटनेप्रकरणी मनसेचे नेते नितीन सरदेसाईंनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'या प्रवासात मी राज ठाकरेंसोबत होतो. त्यामुळे अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं मी ठामपणे सांगू शकतो,' असे सरदेसाईंनी सांगितलं. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे