मनसेच्या पदाधिकाऱ्याने व्यवस्थापकाच्या श्रीमुखात भडकावली; व्हिडिओ व्हायरल
By राजेश भोस्तेकर | Updated: August 28, 2022 13:37 IST2022-08-28T13:33:36+5:302022-08-28T13:37:26+5:30
अलिबागच्या जिल्हा रूग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कक्षात हा प्रकार घडला.

मनसेच्या पदाधिकाऱ्याने व्यवस्थापकाच्या श्रीमुखात भडकावली; व्हिडिओ व्हायरल
अलिबाग : गर्भवती महिलांची ने-आण करण्यासाठी 102 क्रमांकाच्या रूग्णवाहिका सेवा देत असतात. त्यावरील चालकांचा पगार देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या व्यवस्थापकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. अलिबागच्या जिल्हा रूग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कक्षात हा प्रकार घडला.
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे हे कंपनीच्या व्यवस्थापकाच्या कानशीलात मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या चालकांना पगार तर वेळेवर दिला जात नाही. परंतु शासनाकडून 15 हजार 900 रूपये इतके वेतन मिळत असताना ठेकेदार केवळ 9 हजार रूपये या चालकांच्या हातावर टेकवत असल्याचा आरोप केला जात आहे.