रोहा-औरंगाबाद एसटीला मनसेने लावले फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 23:57 IST2021-01-10T23:57:31+5:302021-01-10T23:57:50+5:30
औरंगाबादचे नाव बदलण्याची मागणी

रोहा-औरंगाबाद एसटीला मनसेने लावले फलक
पाली : औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी महाराजनगर करण्यासाठी सुधागड मनसे आक्रमक झाली आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजता जांभूळपाडा येथे रोहा औरंगाबाद एसटीला थांबवून, औरंगाबाद फलकाऐवजी छत्रपती संभाजी महाराजनगरचे फलक लावण्यात आले.
बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते की, औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी महाराजनगर करण्यात यावे, असे मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे यांनी सांगितले, तसेच या सरकारने ते लवकर करावे, अन्यथा राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे करण्यास सक्षम आहे. असेही मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे व विभाग प्रमुख केवल चव्हाण यांनी सांगितले. यावेळी मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे, सचिव राजेश लखिमळे मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.