आमदार राजन साळवी मालमत्ता चौकशी प्रकरण; भाऊ, वहिनी, पुतण्या ने मागितली वेळ
By राजेश भोस्तेकर | Updated: December 27, 2023 13:30 IST2023-12-27T13:30:05+5:302023-12-27T13:30:32+5:30
बुधवारी कुटुंब राहिले चौकशीला गैरहजर

आमदार राजन साळवी मालमत्ता चौकशी प्रकरण; भाऊ, वहिनी, पुतण्या ने मागितली वेळ
अलिबाग : कोकणातले ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या भाऊ, वहिनी आणि पुतण्या याना बुधवारी २७ डिसेंबर रोजी रायगड लाच लुचपत विभागाने चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. लाच लुचपत कार्यालयात हजर राहण्यासाठी साळवी कुटुंबीयांनी १० जानेवारी २०२४ पर्यंत वेळ वाढवून मागितली आहे. त्यामुळे साळवी यांचे कुटुंबीय बुधवारी एसीबी कार्यालयात हजर राहिले नाहीत.
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या मालमत्ते बाबत गेली वर्षभर रायगड लाच लुचपत विभागातर्फे चौकशी सुरू आहे. बुधवार २७ डिसेंबर रोजी साळवी यांचा भाऊ, वहिनी आणि पुतण्या यांना चौकशीला हजर राहण्याची नोटीस रायगड लाच लुचपत विभागाने दिली होती. आमदार साळवी यांच्या जमीन खरेदी आणि हॉटेलमधील भागीदारी बाबत चौकशीला बोलवण्यात आले होते.
बुधवारी साळवी कुटुंब अलिबाग येथील लाच लुचपत कार्यालयात हजर झाले नव्हते. कुटुंबीयांनी दहा जानेवारीपर्यंतची वेळ लाच लुचपत विभागाकडे वाढवून मागितली आहे. त्यामुळे आता दहा जानेवारीला आमदार साळवी यांच्या भावाचे कुटुंब हजर राहण्याची शक्यता आहे.