मुंबई-पुणे महामार्गावर मिक्सर टँकर पलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 01:14 IST2019-12-26T01:14:14+5:302019-12-26T01:14:31+5:30

तो दस्तुरी येथे पलटी होऊन झाडीत घुसला, यात चालक टँकरमध्ये अडकला

Mixer tanker overturned on Mumbai-Pune highway | मुंबई-पुणे महामार्गावर मिक्सर टँकर पलटला

मुंबई-पुणे महामार्गावर मिक्सर टँकर पलटला

वावोशी : मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर दस्तुरी येथे मिक्सर टँकरचा ब्रेक फेल झाल्याने टँकर पलटी झाला. या अपघातात चालक जखमी झाला. लोणावळ्याहून माल घेऊन मिक्सर टँकर येत असताना अमृतांजन पुलावरील तीव्र उतारावर त्याचा ब्रेक फेल झाला.

तो दस्तुरी येथे पलटी होऊन झाडीत घुसला, यात चालक टँकरमध्ये अडकला असून तो किरकोळ जखमी झाला आहे, त्याला बोरघाट पोलीस व स्थानिकांनी बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल के ले. तर या अपघातात टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 

Web Title: Mixer tanker overturned on Mumbai-Pune highway

टॅग्स :Raigadरायगड