कामोठ्यातील बेपत्ता मुलगी सापडली
By Admin | Updated: July 8, 2015 22:47 IST2015-07-08T22:47:11+5:302015-07-08T22:47:11+5:30
कामोठे येथून लापता झालेल्या प्रियांका गुप्ता (१०) हिचे अपहरण झालेलेच नसल्याचे गुन्हे शाखा पोलिसांनी उघड केले आहे.

कामोठ्यातील बेपत्ता मुलगी सापडली
नवी मुंबई : कामोठे येथून लापता झालेल्या प्रियांका गुप्ता (१०) हिचे अपहरण झालेलेच नसल्याचे गुन्हे शाखा पोलिसांनी उघड केले आहे. तिच्या आईने विवाहबाह्य प्रेमसंबंध असलेल्या व्यक्तीसोबत मिळून तिला सोडले होते. तर तिच्या अपहरणाची खोटी तक्रार कामोठे पोलिसांकडे केली होती.
३ जुलै रोजी कामोठे पोलीस ठाण्यात प्रियांकाच्या अपहरणाची तक्रार दाखल झाली होती. त्याचदिवशी ऐरोलीतून फ्रेन्शिला वाझ हिचेही अपहरण झालेले असल्याने दोन्ही प्रकरणांचा तपास पोलिसांनी सुरू केला होता. पोलिसांनी चार दिवसांत या प्रकरणाचा उलगडा करून तिघांना अटक केली आहे. आई व सावत्र पित्याने मित्राच्या मदतीने प्रियांकाला सोडून दिले होते. यानंतर तिच्या अपहरणाची खोटी तक्रार कामोठे पोलिसांकडे दाखल केली. तपासात पोलिसांना तिची आई पूनम गुप्ता (३५) हिच्या वागण्यावर संशय आला. यामुळे पोलिसांनी तिचे उत्तर प्रदेशमधील मूळ गाव गाठले असता तिचा खोटारडेपणा उघड झाला.