कर्जत : माथेरानची मिनीट्रेन पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्र ठरली आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या माथेरानच्या मिनीट्रेनचा प्रवास आता आणखी गारेगार होणार आहे. मध्ये रेल्वेने मिनीट्रेनला आकर्षक डब्यांसोबत वातानुकूलित डबादेखील जोडला आहे. शनिवारी हा वातानुकूलित डबा जोडलेली मिनीट्रेन सकाळी ८.५० मिनिटांनी नेरळहून माथेरानसाठी रवाना झाली. या बोगीत एकूण १६ आसनव्यवस्था ठेवण्यात आली आहे. बोगीत दोन एसी बसवण्यात आले आहेत. पहिल्याच एसी डब्याच्या ट्रेनला प्रवासीवर्गाने भरभरून प्रतिसाद दिला आहे. आकर्षक डबे, उत्तम आसनव्यवस्था, निसर्ग न्याहाळण्यासाठी मोठ्या पारदर्शक खिडक्या, माथेरानचे सौंदर्य व विशेषता दर्शवणारी चित्रे रेखाटलेले डबे यामुळे माथेरानच्या राणीचे सौंदर्य अजून खुलले आहे. या नव्या रूपाची प्रवाशांनाही भुरळ पडत आहे. वातानुकूलित डब्याच्या एका आसनासाठी ४१५ रु पये घेतले जाणार आहेत, तर सामान्य अनारक्षित तिकीट ७५ रु पये आहे.
मिनीट्रेनचा प्रवास आता वातानुकूलित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 00:52 IST