शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घारापुरीतील शेतबंदर येथे मिनीट्रेनला अपघात, पर्यटक बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 04:42 IST

घारापुरी बेटावर पर्यटकांची वाहतूक करणारी मिनीट्रेन रुळावरून घसरून रविवारी अपघात झाला.

उरण : घारापुरी बेटावर पर्यटकांची वाहतूक करणारी मिनीट्रेन रुळावरून घसरून रविवारी अपघात झाला. मात्र, या अपघातातून प्रवास करणारे देशी-विदेशी पर्यटक थोडक्यात बचावले असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आली. मात्र, वारंवार होणाऱ्या मिनीट्रेनच्या अपघातामुळे पर्यटकांची सुरक्षाच धोक्यात आली आहे.घारापुरी बेटावर दररोज हजारो देशी-विदेशी पर्यटक लेण्या पाहण्यासाठी येतात. गेटवे आॅफ इंडिया येथून घारापुरी बेटावरील शेतबंदर जेट्टीवर उतरल्यावर देशी-विदेशी पर्यटकांसाठी खासगी कंपनीकडून मिनीट्रेनची सेवा पुरविते. आबालवृद्ध पर्यटक सहलीचा आनंद लुटण्यासाठी मिनीट्रेनच्या प्रवासालाच प्राधान्य देतात.रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास पर्यटकांना घेऊन जाणारी मिनीट्रेन रु ळावरून घसरली. मात्र, यात पर्यटक थोडक्यात बचावले.शेतबंदर येथील मिनीट्रेनला अपघात होण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात काही विदेशी पर्यटक जखमी झाले होते. वारंवार होणाºया अपघातामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिनीट्रेनच्या रु ळावर इंजिनचे आॅइल सांडलेले असते, त्यामुळे रु ळ निसरडे होऊन अपघाताची शक्यता निर्माण होते. मात्र, याकडे खासगी कंपनीकडून दुर्लक्षच केले जाते. मिनीट्रेनचे आॅडिट आणि चालकाच्या अनुभवाबद्दलही प्रश्नचिन्ह आहे.गेल्या महिन्यात बेटावर येणाºया पर्यटकांच्या सुरक्षेबाबत झालेल्या बैठकीतही मिनीट्रेनच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा अधिकाºयांनी उपस्थित केला होता. आता या अपघाताची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघात