शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

माथेरान इको सेन्सेटीव्ह झोन सनियंत्नण समीतीची ७ एप्रिल रोजी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 19:27 IST

 पर्यावरण व वन मंत्नालयाच्या अधिसुचनेद्वारे गठित माथेरान ईको सेन्सिटिव्ह झोन नियंत्नण समीतीची बैठक येत्या ७ एप्रिल रोजी माथेरान येथे आयोजित करण्यात आली आहे. या समीतीकडे करावयाच्या तक्रारी, तसेच या क्षेत्नात करावयाच्या विकासकामांचे प्रस्ताव दिलेल्या मुदतीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवशी यांनी केले आहे.

-  जयंत धुळप 

रायगड -  पर्यावरण व वन मंत्नालयाच्या अधिसुचनेद्वारे गठित माथेरान ईको सेन्सिटिव्ह झोन नियंत्नण समीतीची बैठक येत्या ७ एप्रिल रोजी माथेरान येथे आयोजित करण्यात आली आहे. या समीतीकडे करावयाच्या तक्रारी, तसेच या क्षेत्नात करावयाच्या विकासकामांचे प्रस्ताव दिलेल्या मुदतीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवशी यांनी केले आहे.

रायगड व ठाणे जिल्हयातील एकूण ८९ गावांचा प्रदेश संवेदनशील 

भारत सरकारच्या पर्यावरण व वन विभागाच्या दि.४ फेब्रुवारी २००३च्या अधिसूचनेन्वये रायगड व ठाणे जिल्हयातील एकूण ८९ (काही पूर्ण व काही अंशत:) गावांचा प्रदेश संवेदनशील क्षेत्न म्हणून घोषित करण्यात आला आहे. यात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक पुर्ण  व १९ अंशत: अशी एकूण २० ,खालापूर तालुक्यातील अंशत: १०,पनवेल तालुक्यातील पुर्ण दोन व अंशत: ३८ अशी एकूण-४०,आणि ठाणे जिल्हयातील अंबरनाथ तालुक्यातील अंशत: १९ अशा एकूण ८९ गावांचा प्रदेश समाविष्ट आहे. समाविष्ट गावांची यादी संबंधित तहसिलदारांकडे पहावयास उपलब्ध आहे. 

वासुदेव जी.गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय सनियंत्नण समीती 

भारत सरकारच्या पर्यावरण विभागाच्या आदेशान्वये, सेवा निवृत्त सनदी अधिकारी वासुदेव जी.गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली एकूण नऊ सदस्यांची सनियंत्नण समीती दोन वर्षाकरीता गठीत करण्यात आली असून रायगड जिल्हाधिकारी हे या समीतीचे सदस्य सचिव आहेत. या समीतीची दुसरी बैठक ७ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता माथेरान मधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विश्रमगृहात आयोजित करण्यांत आली आहे.

विकास प्रस्ताव बैठकीच्या पाच दिवस आधी पोहोचणे आवश्यक

या गावामधील संवेदनशील क्षेत्न म्हणून घोषित केलेल्या प्रदेशातील सर्व विकास विषयक कामे, सर्व बांधकामे व बांधकामाचे नुतनीकरण, संवेदनशील क्षेत्नात करावयाचे कोणतेही खाणकाम, तसेच भूगर्भातील पाण्याची विक्री या कामांना सनियंत्नण समीतीच्या पूर्व मान्यतेची आवश्यकता आहे. या समीतीकडे कोणास काही तक्रारी करावयाच्या असतील तर त्यांनी त्यांचे तक्रार अर्ज जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांचेकडे सपूर्द करावेत.असे तक्रार अर्ज सनियंत्नण समीतीच्या बैठकीत विचारार्थ घेतले जातील. तसेच विकास करावयाच्या कामासाठी सनियंत्नण समीतीची मान्यता घेण्याच्या दृष्टीने आपले प्रस्ताव १० प्रतीत जिल्हाधिकारी रायगड अलिबाग तथा सदस्य सचिव सनियंत्नण समीती यांच्याकडे सनियंत्नण समीतीच्या बैठकीपूर्वी किमान पाच दिवस अगोदर पाठवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवशी यांनी केले आहे.

टॅग्स :MatheranमाथेरानRaigadरायगड