शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

माथेरानमध्ये वाहनबंदीचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 5:01 AM

- कांता हाबळे  नेरळ  - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटनस्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे ...

- कांता हाबळे नेरळ  - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटनस्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात आहेत. रात्री हा सर्व खेळ सुरू असून या प्रकरणाची माहिती नगरपालिका आणि पोलीस प्रशासन देखील देत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने माथेरान हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील केले. त्याआधी माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून वाहनांना बंदी आहे. रु ग्णवाहिका वगळता माथेरानमध्ये कोणत्याही प्रकारच्या वाहनांना येथील लाल मातीच्या रस्त्यावर प्रवेश नाही. त्यामुळे वाहनबंदी आदेशाचे पालन सर्व शासकीय यंत्रणा यांच्याकडून होत असते. मात्र, मागील काही वर्षांत माथेरानमध्ये वाहने घुसवली जात आहेत. फेब्रुवारी महिन्यात एका नगरसेवकाने पेव्हर ब्लॉकने भरलेला ट्रक मध्यरात्री घुसवला आणि त्यावर अश्वपाल संघटनेने आक्षेप घेतल्यानंतर काही दिवस माथेरानमधील वातावरण गरम झाले होते. हे सुरू असताना माथेरान नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने नियोजन करून रु ग्णवाहिकेचा अनधिकृत वापर होणार नाही आणि कोणतीही वाहने निर्बंध असलेल्या भागात प्रवेश करणार नाहीत याची काळजी घेण्यास सुरु वात केली. मात्र, प्रशासनाच्या सहकार्याबाबत अश्वपाल संघटनेच्या आक्र मक भूमिकेनंतर दस्तुरी नाका येथे माथेरान गावात रुग्णवाहिका येण्यासाठी असलेल्या रस्त्यावरील लोखंडी गेट कुलूपबंद केले.नगरपालिकेने त्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली होती. मात्र,१३ मार्चच्या रात्री पुन्हा पावणेतीनच्या सुमारास रस्त्याचे काम करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य घेऊन निघालेला ट्रक दस्तुरी नाका येथील लोखंडी गेटचे कुलूप उघडून आतमध्ये शिरले. याबाबत १८ मार्चपर्यंत माथेरानमध्ये कोणालाही कोणतीही माहिती नव्हती. मात्र, एका आरटीआय कार्यकर्त्याने दस्तुरी नाका येथे लोखंडी गेटवर लक्ष ठेवण्यासाठी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता १३ मार्च रोजी दोन ट्रक शहरात गेले असल्याचे उघड झाले.त्या कार्यकर्त्याने त्याबाबत माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांना फुटेजचे व्हिडीओ पाठवले. त्याचवेळी अलिबागमध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची क्र ाइम मीटिंग सुरू होती.ब्रिटिश काळापासून आलेले नियम डावलून होत असलेली वाहनांची घुसखोरी याबद्दल आदेश दिल्यानंतर माथेरान पोलिसांनी घटना घडल्यानंतर तब्बल सहाव्या दिवशी गुन्हा नोंद केला.  सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे १३ मार्च रोजी पर्यावरण नियम डावलून आणि वाहनबंदीचा आदेश डावलून शहरात मालवाहतूक करण्यासाठी गेलेल्या दोन ट्रकवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. माथेरानमधील रस्त्यावर टेम्पो घालणाऱ्या चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या रस्त्यावर असलेले गेट रात्री सील करण्यात येणार आहे. येथे दिवस-रात्र एक कामगार नेमण्यात येणार असून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार आहे. फक्त रुग्णवाहिके साठीरस्ता दिला जाईल, रुग्णवाहिके च्यानावाखाली अनेक जण गैरफायदा घेत आहे; परंतु यापुढे कठोर कारवाई केली जाईल.    - रामदास कोकरे, मुख्याधिकारी, माथेरान, नगरपालिका

टॅग्स :Matheranमाथेरान