माथेरानची विकासकामे सुरू करावी

By Admin | Updated: July 31, 2015 22:48 IST2015-07-31T22:48:33+5:302015-07-31T22:48:33+5:30

माथेरानच्या पर्यटनपूरक विकासाचा चौदा कलमी कार्यक्र म शासनाने हाती घेतला असून त्या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणारी विकासकामे तातडीने सुरु

Matheran's development works should be started | माथेरानची विकासकामे सुरू करावी

माथेरानची विकासकामे सुरू करावी

कर्जत : माथेरानच्या पर्यटनपूरक विकासाचा चौदा कलमी कार्यक्र म शासनाने हाती घेतला असून त्या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणारी विकासकामे तातडीने सुरु करण्याची मागणी आमदार सुरेश लाड यांनी केली. यासाठी एमएमआरडीए आयुक्त यू. पी. एस. मदान यांची भेट घेऊन माथेरान नगरपरिषदेचा प्रस्ताव आणि निवेदन सादर केले. यावेळी माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत, विवेक चौधरी, दयानंद डोईफोडे उपस्थित होते.
राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका विशेष बैठकीत माथेरान विकासाचा चौदा कलमी कार्यक्र म निश्चित करण्यात आला असून नेरळ - माथेरान घाट रस्त्याची दुरु स्ती आणि सुशोभीकरण, माथेरान अंतर्गत दस्तुरी ते शार्लोट लेक या दरम्यानच्या रस्त्याची दुरु स्ती आणि सुशोभीकरण तसेच प्रेक्षणीय स्थळांची दुरु स्ती व सुशोभीकरण मुख्य तीन कामासाठी १४५ कोटी रु पयांचा निधी मंजूर झाला असून हे काम एमएमआरडीएमार्फत करण्यात येणार आहे. यापैकी नेरळ ते माथेरान घाट रस्त्याच्या कामाची दोन वेळा निविदा काढण्यात आली, मात्र दोन वेळा एमएमआरडीएच्या अंदाजपत्रकापेक्षा कमी दाराची निविदा येवूनही पुन्हा या कामाची निविदा काढण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतल्याने माथेरान घाट रस्त्याची दुरु स्ती आता लांबणीवर पडली आहे तर अंतर्गत रस्त्याचे, प्रेक्षणीय स्थळांच्या सुशोभीकरणाच्या कामाचे सर्वेक्षण आणि अंदाज पत्रकांचे काम सुरु असल्याची माहिती आहे. (वार्ताहर)

एमएमआरडीएने कल्याण-कर्जत ते हाळपर्यंतच्या रस्त्याचे काम केले आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याची तक्र ार आमदार सुरेश लाड यांनी केली. हा रस्ता पहिल्याच पावसात उखडला असून त्याची तातडीने दुरु स्ती करण्याची मागणी देखील यावेळी केली.

माथेरानचे पर्यटन क्षेत्र म्हणून महत्त्व लक्षात घेता माथेरानसाठी मंजूर असलेली विकासकामे तातडीने सुरु करावी अशी मागणी आ.लाड यांनी केली. याविषयी तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही एमएमआरडीए आयुक्त मदान यांनी दिली .

Web Title: Matheran's development works should be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.