शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
5
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
6
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
7
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
8
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
9
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
10
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
11
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
12
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
13
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
14
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
15
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
16
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
17
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
18
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
19
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
20
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या

माथेरानकर तीन दिवस पाण्याविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:31 AM

यंत्रसामुग्री, जनरेटरची दुरवस्था

माथेरान : रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाची नोंद असलेले माथेरानकरांना तीन दिवस पिण्याच्या पाण्याविना काढावे लागल्याने येथील जल प्राधिकरणाच्या कारभाराविषयी सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे.माथेरान पर्यटन नगरीस येथील शार्लोट लेक येथून पाणीपुरवठा होत असतो. मात्र, मागील काही वर्षांमध्ये येथे झपाट्याने पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने हे पाणी कमी पडू लागले होते. त्याकरिता नेरळ येथील उल्हासनदीचे पाणी पंपांद्वारे माथेरानपर्यंत नेऊन पाणीटंचाईवर मात करण्यात आली. मात्र, हे पाणी नेताना माथेरान येथील शार्लोट लेक येथील पम्पिंग स्टेशनकडे प्राधिकरणाने दुर्लक्ष केले. पूर्वी येथे वीज नसली, तरी जनरेटरच्या साहाय्याने पाणी पम्पिंग करून सर्वत्र वितरित केले जात होते. मात्र, नेरळहून येणारे पाणी येथील जलशुद्धीकरण केंद्रात येऊ लागल्याने शार्लोट लेक येथील कार्यालय बंद पडू लागले. त्याच्यामुळे येथे असलेली यंत्रसामुग्री व जनरेटरच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाल्याने येथील एक-एक सुविधा बंद होऊ लागल्या, ज्याचे विपरित परिणाम आता माथेरानकरांना भोगावे लागत आहेत.नेरळ येथील पाणीपुरवठा खंडित झाल्यास व शार्लोट लेक येथील वीज अनियमित झाल्यास माथेरानकरांना पिण्याच्या पाण्यास मुकावे लागते. येथील लाखो रुपयांचे जनरेटर वापराविना गंजले आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त पाणीबिल माथेरानमध्येच आकारले जाते, तरीही अनेक वेळा वीज नसली की येथील पाणीपुरवठा खंडित होत असतो, असे वर्षातून दोन-तीन वेळा होत असते. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास जल प्राधिकरण अपयशी ठरले आहे.माथेरानमध्ये व्यावसायिक व घरगुती अशा जवळपास तेराशे नळजोडण्या आहेत. त्याचे मासिक उत्पन्न सरासरी वीस लाखांच्या आसपास होते. म्हणजे जोडण्यांच्या हिशोबाने येथे उत्पन्न जास्त आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतन पाच-सहा लाख पकडले, तरी जल प्राधिकरणाकडे मोठी रक्कम उरत आहे. मात्र, नेरळ ते माथेरानदरम्यान असलेली मोठी पम्पिंग स्टेशन व त्याला लागणारी वीज देयकांची रक्कम बारा लाखांच्या आसपास आहे. त्यामुळेच ही पाणी योजना माथेरानकरांना महाग पडत आहे. जल प्राधिकरण ही विजेची बिले माथेरानकरांकडून जादा भाडे लावून वसूल करीत आहे व याच पम्पिंग स्टेशनवरून अनेक पाणीजोडण्या देण्यात आल्या आहेत, त्यांना मात्र त्यात सूट मिळत आहे, तसेच शासनाकडून वीजबिलामध्ये सवलत मिळण्यासाठी प्रयत्न न करता माथेरानकरांना वेठीस धरले जात आहे. इतके करूनही माथेरानकरांना मात्र दिलासा नाहीच पाणी बिले भरण्यास विलंब झाल्यास पाणीजोडणी कापल्या जातात.जनरेटरच्या दुरुस्तीची मागणीमागील तीन दिवसांपूर्वी जमिनीखालून गेलेल्या वीजवाहिनी खराब झाल्याने शार्लोट लेक येथील पम्पिंग स्टेशन बंद पडले, तर याच दरम्यान जुम्मापट्टी येथील नेरळ येथून होणारी पम्पिंग स्टेशनमधील पंपमध्ये बिघाड झाल्याने, माथेरानकरांना होणारा पाणीपुरवठा खंडित झाला होता.येथील मर्यादित मालवाहतूक व्यवस्था लक्षात घेता, हा पुरवठा पूर्ववत करण्यास उशीर लागला. त्यामुळे भरपावसात माथेरानकरांचे पिण्याच्या पाण्याचे वांदे झाले होते. येथील कर्मचारी मर्यादित सुविधांच्या आधारे नागरिकांना सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. मात्र, यांत्रिक आघाडीवर साथ मिळत नसल्याने त्यांचा नाईलाज होत आहे.अजूनही शार्लोट लेक येथील वीजपुरवठा सुरू झालेला नसून, नेरळ येथून येणारे पाणी जल प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र काम करून सुरू केल्याने, मंगळवारी तीन दिवसांनंतर माथेरानकरांना दिलासा मिळाला आहे. जनरेटरची दुरुस्ती व्हावी किंवा नवीन जनरेटर बसविण्यात यावेत.

टॅग्स :water shortageपाणीकपात