सेल्फी काढण्याच्या नादात महिलेचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 10:59 AM2018-06-20T10:59:37+5:302018-06-20T11:14:25+5:30

सेल्फी काढण्याच्या नादात जीव गमवावा लागल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. सेल्फी काढत असताना एका 35 वर्षीय महिलेचा खोली दरीत कोसळून मृत्यू झाला आहे.

Matheran : new delhi's woman dies while clicking selfie | सेल्फी काढण्याच्या नादात महिलेचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू

सेल्फी काढण्याच्या नादात महिलेचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू

Next

रायगड - सेल्फी काढण्याच्या नादात जीव गमवावा लागल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. सेल्फी काढत असताना एका 35 वर्षीय महिलेचा खोली दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. माथेरानमधील ही घटना आहे. सरिता चौहान असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. सरिता चौहान या कुटुंबीयांसोबत माथेरानमध्ये फिरायला आलेल्या असतानाही दुर्दैवी घटना घडली आहे. यादरम्यान, मंगळवारी (19 जून) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सरिता कुटुंबासोबत लुईसा पॉईंटवर फिरायला गेल्या होत्या. लुईसा पॉईंटवर सुमारे 500 ते 600 फूट खोल दरीजवळ असलेला कठडा ओलांडून सरिता पतीसोबत सेल्फी काढण्यासाठी गेले होते. यावेळी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सरिता यांचा तोल जाऊन त्या खोल दरीत कोसळल्या.

याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. दुर्दैव म्हणजे शोधमोहीमेदरम्यान पोलिसांना सरिता यांचा मृतदेह सापडला. सेल्फी काढताना जीव गमवावा लागल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. केवळ एका सेल्फी नादात अख्खं आयुष्य गमवावं लागण्याची वेळ येऊ नये, यासाठी सर्वांनीच स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. 

Web Title: Matheran : new delhi's woman dies while clicking selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Selfieसेल्फी