माथेरान मिनीट्रेन बंदमुळे पर्यटकांचे हाल
By Admin | Updated: June 12, 2016 00:59 IST2016-06-12T00:59:32+5:302016-06-12T00:59:32+5:30
माथेरान मिनीट्रेनचे डबे मे महिन्यात दोनदा घसरल्याने ही सेवा काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ऐन सुटीच्या हंगामात ही सेवा बंद झाल्याने पर्यटकांना

माथेरान मिनीट्रेन बंदमुळे पर्यटकांचे हाल
माथेरान : माथेरान मिनीट्रेनचे डबे मे महिन्यात दोनदा घसरल्याने ही सेवा काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ऐन सुटीच्या हंगामात ही सेवा बंद झाल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. शिवाय स्थानिक व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसला.
मिनीट्रेनची सेवा पूर्ववत व्हावी, यासाठी स्थानिक राजकीय मंडळींनी सलग दोन वेळा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. याकामी रेल्वेमंत्र्यांच्या आदेशानुसार दोनदा मार्गाची चाचणी घेण्यात आली आहे. तेव्हा मार्ग सुरळीत असल्याचे रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.
परंतु अद्याप ही सेवा सुरू केलेली नसल्याने पर्यटकांची पायपीट मात्र सुरूच आहे. आॅक्टोबर १५ ते जून १५ या आठ महिन्यांत रेल्वेसेवा सुरू असते, तर पावसाळ्यात चार महिने गाडीला विश्रांती असते. तीन वर्षांपासून अमन लॉज ते माथेरान स्टेशनपर्यंत शटल सेवा सुरू केल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे.
शटलच्या माध्यमातून अवघ्या अडीच कि.मी.साठी घाट सेक्शन नसताना देखील प्रति प्रवासी ५० रु पये तर नेरळ-माथेरान या २१ कि.मी.साठी ६५० रु पये इतका दर आकारला जात आहे. भरीव उत्पन्न मिळून सुद्धा ही गाडी तोट्यात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. त्यामुळे याबाबत लवकरच तोडगा काढण्याची मागणी होत आहे.