डासांच्या प्रादुर्भावाने नागरिक हैराण
By Admin | Updated: May 9, 2017 01:22 IST2017-05-09T01:22:32+5:302017-05-09T01:22:32+5:30
अलिबाग शहरातील प्रचंड प्रमाणातील डासांच्या प्रादुर्भावामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डास निर्मूलनासाठी

डासांच्या प्रादुर्भावाने नागरिक हैराण
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : अलिबाग शहरातील प्रचंड प्रमाणातील डासांच्या प्रादुर्भावामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डास निर्मूलनासाठी जिल्हा हिवताप अधिकारी आणि अलिबाग नगर पालिकेने शहरातील घराघरात फवारणी मोहीम हाती घेणे गरजेचे आहे, अशी मागणी अलिबाग शहर संघर्ष समितीने केली. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा हिवताप अधिकारी यांना दिले.
अलिबाग नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून डास निर्मूलन मोहिमेंतर्गत औषध फवारणी गेले कित्येक महिने बंद करण्यात आली आहे. डास निर्मूलन मोहीम राबविलीच जात नसल्याची नागरिकांची तक्र ार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गेल्या वर्षभरामध्ये अलिबाग शहरात डासांची उत्पत्ती झपाट्याने झाल्याने नागरिकांना होणारा त्रास वाढला आहे. त्यामुळे तापाच्या रु ग्णांची संख्या वाढली आहे. अनेक नागरिक तर स्वत:सोबत मच्छर घालविण्यासाठी अंगाला लावणारे औषध खिशात घेवून फिरत आहेत. डास निवारणासाठी विविध प्रकारची औषधे, स्प्रे, इलेक्ट्रीक बॅट अशी विविध साधने खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक घराला महिन्याकाठी पाचशे ते सहाशे रुपये खर्च करावा लागत आहे. अशा प्रकारे अलिबाग शहरातील नागरिकांना महिन्याला लाखो रु पयांचा भुर्दंड पडत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता अलिबाग शहरामधील प्रचंड प्रमाणावर असणाऱ्या डासांच्या प्रादुर्भावामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने अलिबाग शहरामध्ये डास निर्मूलनासाठी जिल्हा हिवताप कार्यालय, अलिबाग नगर पालिकेने शहरामधील डासांची घनता मोजण्याची व घरोघरी पाण्यात फवारणी मोहीम सुरू करावी, अशी विनंती संघर्ष समितीने निवेदनाद्वारे केली आहे.
संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. सागर पाटील, सदस्य अॅड. श्रध्दा ठाकूर, अॅड. महेश मोहिते, सुनील दामले, किशोर अनुभवणे, समीर ठाकूर, अॅड. अजय उपाध्ये, संजय सावंत यांनी याबाबतचे निवेदन जिल्हा हिवताप अधिकारी यांना दिले आहे.