शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

358 मशालीच्या प्रकाशात उजळून निघाला प्रतापगड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 12:12 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापराक्रमाने पुनीत झालेल्या किल्ले प्रतापगडावर शुक्रवारी चतुर्थीच्या दिवशी भवानी माता मंदिराला 358 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून रात्री 8.30 वाजता गडावर 358 मशाली प्रज्वलित करून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. 

प्रकाश कदम

पोलादपूर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापराक्रमाने पुनीत झालेल्या किल्ले प्रतापगडावर शुक्रवारी चतुर्थीच्या दिवशी भवानी माता मंदिराला 358 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून रात्री 8.30 वाजता गडावर 358 मशाली प्रज्वलित करून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला.  ज्यांच्या नसा नसात शिवभक्ति ठासुन भरली आहे, असे प्रतापगडचे स्थानिक भूमिपुत्र आप्पा उतेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा दैदीप्यमान सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून असंख्य शिवभक्त प्रतापगडावर आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वराज्य ढोल पथकाच्या ढोल ताशाच्या ठेक्यावर झाली.

सुमारे दोन तास अत्यंत लयबद्ध स्वरात चाललेले ढोल ताशा समूह वादन ऐकून अवघा शिवभक्त मंत्रमुग्ध झाला. त्यानंतर प्रतापगड वासिनी भवानी मातेच्या मंदिरातून दीप प्रज्वलित करून मशाली प्रकाशमान करण्यात आल्या यावेळी आप्पा उतेकर, माजी सरपंच विजय हवालदार, आनंद उतेकर, संतोष जाधव, भवानी मंदिर व्यवस्थापक परदेशी,यांच्या सहआदि मान्यवर उपस्थित होते. मशाली घेवून मावळे शिवप्रताप बुरुजाकडे सरसावले, संपूर्ण तटबंदीला लावलेल्या मशाली पेटवण्यात आल्या. गडांनी जरी धुक्याची चादर पांघरली असली तरी 358 मशालीच्या उजेडात संपूर्ण प्रतापगड उजळून निघाला.

हे नयनरम्य नेत्रसुखद दृश्य पाहण्यासाठी हजारो शिवभक्तांनी गर्दी केली होती भाळी..लावुन टिळा कुंकवाचा..पोत नाचवत ..मशाल भणभणवत ..ऐक-ऐक कवडी अर्पित ...आम्ही गोंधळी नाचतो..धन्य होतो त्या आदिशक्तिचरणी..सेवेची ही शिदोरी भरपूर मिळते अशी..शिवबांचा गड प्रतापगड..अग्निवर्षावात फुलुन टाकते हिच ज्वालेची दिवटी जशी. जणू शिवकाळ अवतरल्याची साक्ष देत होती.किल्ले प्रतापगडावरील जगदंबेच्या मंदिरास सन् 2010 साली 350 वर्षे पूर्ण झाली याचे औचित्य साधुन या मशाल महोत्सवची सुरुवात छ.उदयनराजे भोसले, राजमाता कल्पनाराजे भोसले, शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थित करण्यात आली.

अर्थात ही संकल्पना होती शिवभक्त आप्पा उतेकर यांची. माय भवानी सामाजिक संस्था, शिवमुद्रा प्रतिष्ठान पोलादपुर,  स्वराज्य ढोलपथक, जननीमाता नवरात्रोत्सव समिती  वाडा कुंभरोशी ,सांगली विठा समूह,स्वस्तिक ग्रुप पालघर,प्रताप गड ग्रामस्थ व अनेक संस्था व्  व्यक्ति या कार्यक्रमाला मदत करत असतात. यंदा या कार्यक्रमाचे नवंवे वर्ष ढोल ताशाच्या गजर, पारंपरिक गोंधळ,  फटाकयांची आतिषबाजी, सोहळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्त प्रतापगड़ावर उपस्थित होते

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले