खोपोलीत विवाहितेचा खून
By Admin | Updated: September 2, 2015 03:47 IST2015-09-02T03:47:22+5:302015-09-02T03:47:22+5:30
अनेकदा पैशाची मागणी करूनही माहेरहून पैसे आणण्यास नकार देणाऱ्या विवाहितेला गळा आवळून ठार मारल्यानंतर रॉकेल टाकून पेटवून देत आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पती व सासूच्या

खोपोलीत विवाहितेचा खून
खालापूर : अनेकदा पैशाची मागणी करूनही माहेरहून पैसे आणण्यास नकार देणाऱ्या विवाहितेला गळा आवळून ठार मारल्यानंतर रॉकेल टाकून पेटवून देत आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पती व सासूच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नराधम पतीला खोपोली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील सासू फरार आहे.
खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशवंतनगर येथे राहत असलेल्या वंदना वाघमारे हिचा विवाह मनोज रामजी वाघमारे यांच्याबरोबर झाला होता. वंदना व मनोजला दोन मुले असून गेली काही दिवस मनोज व त्याची आई पैशासाठी वंदनाचा मानसिक छळ करत होते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वंदना होणारा सर्व त्रास निमूटपणे सहन करत होती. ३० आॅगस्टला सकाळी या वरूनच वंदनाचा पती व सासू बरोबर जोरदार वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या मनोज व त्याच्या आईने वंदनाचा गळा आवळून खून केला. हे प्रकरण आपल्या अंगाशी येवू नये म्हणून दोघांनी मिळून वंदनाचा स्टोव्हच्या भडक्याने जळून मृत्यू झाल्याचा बनाव तयार केला.
वंदनाचा पैशासाठी छळ होत असल्याचे वंदनाची आई सुरेखा दीपक कदम यांना माहीत असल्याने त्यांनी या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी प्राथमिक तपास करून वंदनाचा गळा आवळून खून केल्या प्रकरणी पती मनोज वाघमारे व सासू विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वंदनाचा पती मनोज याला अटक केली आहे. (वार्ताहर)